14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 7 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार, दुकानदाराचे लज्जास्पद कृत्य

मुंबई तक

• 03:31 PM • 09 Aug 2026

crime news : नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला. सदर ठाणे क्षेत्रात एक भाजी विक्रेता हा 14 वर्षीय मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता. पीडित अल्पवयीन मुलीने या परिस्थितीचा सामना केला होता. नंतर तिने धाडस दाखवून कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नराधमाकडून अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार

point

नराधमाच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं कुटुंबाला दिली माहिती

crime news : एका नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला. सदर ठाणे क्षेत्रात एक भाजी विक्रेता हा 14 वर्षीय मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता. पीडित अल्पवयीन मुलीने या परिस्थितीचा सामना केला होता. नंतर तिने धाडस दाखवून कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. नंतर कुटुंबीयांनी मिळून 7 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली आहे. ही घटना राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील असून घटनेनं परिसर हादरून गेलाय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 15 वर्षीय मुलीचा मौलानाकडून लैंगिक छळ, लाज आणणारा प्रकार

पोलिसांच्या तक्रारीच्या आधारे घटनेचा पुढील तपास हा सुरू ठेवण्यात आलाय. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास केला होता. आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात आलेत. पोलिसांनी सांगितलं की, तपासाच्या आधारावर कारवाई केली जाईल. ही घटना समोर आल्यानंतर सर्वीकडे एकच चर्चा सुरू आहे. 

पीडित अल्पवयीन मुलगी भाजीवाल्याच्या दुकानावर करत होती काम

बाडमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश आर्यने सांगितलं की, पीडित अल्पवयीन मुलगी ही आरोपी भाजीवाल्याच्या दुकानावर काम करत होती. याचदरम्यान दुकानदाराने तिच्यासोबत वारंवार अत्याचार करणे सुरू ठेवले होते. पीडितेनं नराधमाच्या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली होती. 7 ऑगस्ट रोजी पीडितेनं पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : 'तू माझ्या बायकोशी का बोलतोस,' म्हणत नवऱ्याने तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

पोलिसांनी पीडितेची मेडिकल चाचणी केली, नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी लक्ष घालत तपास सुरूच ठेवला आहे.