जालना : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् नंतर 7 महिने...,16 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?

मुंबई तक

• 04:49 PM • 09 Aug 2026

जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षीय मुलीचं गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Jalna Crime News

Jalna Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालना : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् नंतर 7 महिने...

point

16 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?

Jalna Crime News, गौरव साळी : प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार जालना शहरातून समोर येत आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर गेल्या सात महिन्यांपासून वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जालना शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीशी प्रथम ओळख वाढवली आणि नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवले. आरोपीने मुलीला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर गेल्या सात महिन्यांपासून तिच्यावर सातत्याने अत्याचार सुरूच होते. या प्रकारामुळे पीडित मुलगी मानसिक तणावाखाली होती. अखेर पीडिता या तणावाला आणि जाचाला कंटाळली आणि तिनं एक निर्णय घेतला.

हे ही वाचा : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 7 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार, दुकानदाराचे लज्जास्पद कृत्य

अखेरीस गाठले पोलीस स्टेशन

अखेर या जाचाला कंटाळून पीडितेने शुक्रवारी (7 ऑगस्ट) उशिरा रात्री तालुका जालना पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगत तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायद्यासह इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : 15 वर्षीय मुलीचा मौलानाकडून लैंगिक छळ, लाज आणणारा प्रकार

आरोपीला पोलीस कोठडी

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत संशयित आरोपीला तात्काळ अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तालुका जालना पोलीस करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.