Murder Case: ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. जवळपास 8 महिन्यांनंतर अगदी रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. संबंधित तरुणीची हत्या करण्यात आली असून घटनेमागचं नेमकं कारण काय? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
भुवनेश्वर येथील भरतपुर परिसरात राहणारी निरुपमा परीडा उर्फ मीता नावाची 27 वर्षीय तरुणी एका घरात केअरटेअर म्हणून काम करत होती. 24 जानेवारी रोजी तिचं तिच्या कुटुंबियांसोबत शेवटचं बोलणं झालं. त्या दिवशी पीडितेने तिच्या भाऊ आणि वडिलांना ती तिच्या रणपुरला येत असल्याचं सांगितलं. परंतु, ती तिच्या गावी पोहोचलीच नाही. त्या दिवशी तिचा मोबाईल कित्येक वेळा ऑन आणि ऑफ होत होता.
अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीची हत्या
त्यानंतर कुटुंबियांनी 27 जानेवारी रोजी भरतपुर पोलीस स्टेशनमध्ये मीता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली पण, त्यांना बरेच महिने कोणताच पुरावा हाती लागला नाही. तपास सुरू असताना पोलिसांना काही इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडल्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला. पीडितेचा मोबाईल आणि एटीएम कार्ड कोणी दुसरीच व्यक्ती वापरत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. बराच काळ शोध आणि चौकशी केल्यानंतर पोलीस देबाशीष बिसोई नावाच्या तरुणापर्यंत पोहोचले. संबंधित तरुण हा मीताचा प्रियकर असल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा: पत्नीच्या अफेअरला वैतागला होता पती..सासरच्या लोकांना समजंवायला गेला, मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घडलं तरी काय?
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, चौकशीनंतर देबाशीषने त्याचा गुन्हा कबूल केला. आरोपीने पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मीताचे दुसऱ्याच तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा त्याला संशय होता. याच संशयामुळे आरोपीच्या मनात तिच्या प्रेयसीविषयी राग होता आणि रागाच्या भरात मीताच्या प्रियकराने तिच्याविरोधात भयानक कट रचला.
हत्येनंतर पीडितेचा मोबाईल वापरत होता...
24 जानेवारी रोजी आरोपी प्रियकर मीताला खुर्दाच्या तापंग परिसरातील एका निर्जन ठिकाणी नेलं. तिथे देबाशीषने संधी साधून त्याच्या प्रेयसीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. नंतर, आरोपीने पीडितेचा मृतदेह तिथेच एका खड्ड्यात फेकला. हत्येनंतर, देबाशीष मनात कोणतीच चिंता न बाळगता तिच्या प्रेयसीचा मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड वापरत होता. कित्येक महिने तो आरोपी म्हणून कोणाच्याही नजरेस आला नाही. परंतु, पोलिसांच्या तपासात पीडितेच्या फोनचं लोकेशन आणि एटीएम कार्डच्या वापरामुळे सत्य उघडकीस आलं.
हे ही वाचा: पुणे: गोविंद कोमकरच्या हत्येची Inside स्टोरी, त्यावेळी नेमकं काय घडलं?
शुक्रवारी पोलिसांनी त्याच परिसरातील एका खड्ड्यातून मीताचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी प्रकरणातील आरोपी देबाशीषला अटक केली असून त्याच्याकडे मीताची पर्स, बॅग आणि एटीएम कार्ड सापडले असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
