पतीनं पत्नीचं मुंडकं छाटलं! नंतर शरीराचे 17 तुकडे केले अन् वेगवेगळ्या ठिकाणी फेकले...खतरनाक मर्डरमुळे भिवंडी हादरलं!

Bhiwandi Shocking Murder Case :  भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ताहा नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी परवीन उर्फ मुस्कान मोहम्मद ताहा अन्सारीचा निर्घृण खून केला, असा आरोप आहे.

प्रतीकात्मक प्रतिमा

Shocking Murder Case

मुंबई तक

• 04:56 PM • 06 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीनं पत्नीची केली निर्घृण हत्या

point

मृतदेहाचे केले 17 तुकडे 

point

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Bhiwandi Shocking Murder Case :  भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ताहा नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी परवीन उर्फ मुस्कान मोहम्मद ताहा अन्सारीचा निर्घृण खून केला, असा आरोप आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, हत्येनंतर आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे 17 तुकडे केले आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिलं.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्टसा इदगहा रोडजवळ स्लॉटर हाऊस परिसरात एका महिलेचं छाटलेलं मुंडकं सापडलं होतं. तपास सुरु झाल्यानंतर पोलिसांना ताहावर संशय आला आणि त्यांनी आरोपी ताहाला अटक केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान, आरोपी ताहा त्याचे जबाब बदलत आहे. त्यामुळे हत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाहीय. पोलिसांचं म्हणणं आहे की, मुस्कानच्या शरीराचे इतर तुकडे शोधण्यासाठी ड्रोन आणि फायर ब्रिगेडची मदत घेतली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. 

नेमकं प्रकरण काय?

ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर मुस्कानची आई हनीफा खानने पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यांचं म्हणणं होतं की, मुलीचा फोन दोन दिवसांपासून बंद होता आणि तिचा जावई ताहाही कॉल उचलत नव्हता. नंतर पोलिसांनी छाटलेल्या मुंडक्याचा फोटो दाखवला, तेव्हा हनिफाने तिच्या मुलीचा मृतदेह असल्याचं स्पष्ट केलं. 

हे ही वाचा >> कोल्हापूर: तुमचंही काळीज जाईल पिळवटून, चिमुकला धावत आईकडे आला अन् कुशीतच घेतला शेवटचा श्वास, नेमकं काय घडलं?

मृतदेहाचे केले 17 तुकडे 

भिवंडीच्या भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रतनपारखी यांनी म्हटलं की, आतापर्यंत हे स्पष्ट झालं नाहीय की, हत्या नेमकी कुठे करण्यात आली आणि कोणत्या शस्त्राने मृतदेह कापला..तपासाची चक्रे फिरवण्यासाठी डीसीपी आणि एसीपीच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे. 

त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना 

उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. येथे एका झुडपात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. ही घटना कडाधाम कोतवाली परिसरातील सोराई बुजुर्ग गावात घडल्याची माहिती समोर आली होती. गुरुवारी सकाळी पीडित मुलगी नवाब नावाच्या व्यक्तीच्या घरी पैसे घेण्यासाठी गेली होती. संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही, त्यावेळी कुटुंबातील सदस्य तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले, त्यानंतर गावाबाहेरील झुडपात मुलीचा मृतदेह एका मेंढपाळाला दिसला. मृतदेहाजवळ पीडितेची सायकल पडल्याचं देखील आढळून आलं.

हे ही वाचा >> गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली..तरुणाने टेन्शनमध्ये केलं भयंकर कृत्य, अख्ख गाव हादरलं!

    follow whatsapp