आप नेत्या नंदानी यांचा मृतदेह आढळला, विवाहित बॉयफ्रेंडवर खून केल्याचा आरोप

AAP leader Nandani Bosmia : राजकोटमध्ये आप नेत्या नंदानी बोसमिया हिचा फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. कुटुंबीयांनी हा आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करत लिव्ह-इन पार्टनरवर गंभीर आरोप केले आहेत.

AAP leader Nandani Bosmia

AAP leader Nandani Bosmia

मुंबई तक

• 03:51 PM • 27 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आप नेत्या नंदानी यांचा मृतदेह आढळला

point

विवाहित बॉयफ्रेंडवर खून केल्याचा आरोप

AAP leader Nandani Bosmia : आम आदमी पक्षाच्या  23 वर्षीय नेत्या नंदानी बोसमिया हिच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. नंदानीचा मृतदेह सोमवारी (दि.22) संध्याकाळी तिच्या फ्लॅटच्या हॉलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणात सुरुवातीला आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी नंदानीच्या कुटुंबीयांनी हा खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या विवाहित व्यक्तीवर छळ, मारहाण आणि पुरावे लपवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी भर सभेत 'मुंबई Tak' चा व्हिडीओ दाखवला, म्हणाले,"आईची शपथ घेऊन गद्दारी"

नंदानीचे वडील यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, नंदानीची ओळख जुनागढ येथील विवाहित असलेल्या अस्लम हुसेन सामा याच्याशी झाली होती. त्या वेळी नंदानी त्याच्या मालकीच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती. त्यानंतर दोघांचे संबंध वाढले आणि ते राजकोटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र, गेल्या काही महिन्यांत त्यांच्या नात्यात तणाव वाढला होता. 

नंदानीसोबत राहत असतानाही पत्नीशी संबंध कायम 

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अस्लम हा नंदानीसोबत राहत असतानाही पत्नीशी संबंध कायम ठेवत होता. यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते आणि त्या काळात नंदानीवर शारीरिक अत्याचारही करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वडिलांनी असा दावा केला की, अलीकडील एका वादानंतर नंदानी काही दिवस नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली होती, मात्र मृत्यूपूर्वी काही काळ आधी ती पुन्हा फ्लॅटमध्ये परतली होती.

हेही वाचा : गर्लफ्रेंडच्या भावाला बॉयफ्रेंडने 40 अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवले, सकाळी दोघांची बॉडी सापडली

 अस्लमच्या नातेवाईकांनी यापूर्वी जुनागढमध्ये तिच्यावर हल्ला केला होता. नंदानीला सातत्याने त्रास आणि धमक्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे तिची हत्या करून तिचा मृतदेह गळफास दिल्यासारखा टांगण्यात आला, जेणेकरून हा प्रकार आत्महत्या असल्याचे भासवता येईल, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांमुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

फ्लॅटचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसले अन्.. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदानीच्या नातेवाईकांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीला फ्लॅटवर जाऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी फ्लॅटचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसून आले आणि आत नंदानीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. राजकोट तालुका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत गळफासामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी कुटुंबीयांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर  शवविच्छेदनही करण्यात आले आहे. पोलिसांनी नंदानी आणि अस्लम लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याची तसेच त्यांच्यात वाद होत असल्याची पुष्टी केली असून, आत्महत्येसह कुटुंबीयांनी केलेल्या खुनाच्या आरोपाचाही सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.