Boyfriend Killed Girlfriend : ओडिसाच्या खुर्दा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. जवळपास आठ महिन्यांपूर्वी संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह अखेर सापडला. ज्याप्रकारे तरुणीची हत्या करण्यात आली आणि ज्या व्यक्तीवर हत्येचा आरोप आहे, त्याने या घटनेला खतरनाक वळण लावलं. तरुणीसोबत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
भुवनेश्वरच्या भरतपूर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय निरुपमा उर्फ मीता, एका घरात केअर टेकरचं काम करत होती. तिने 24 जानेवारीला कुटुंबियांशी शेवटचं बोलणं केलं होतं. त्या दिवशी मीताने तिचे वडील आणि भावाला सांगितलं होतं की, ती तिच्या पैतृक गावात रणपूरला जात आहे. पण ती तिथे कधीच पोहोचली नाही. त्या दिवसापासून तिचा मोबाईल फोन अनेकदा स्विच ऑफ येत होता.
अफेअरच्या संशयातून प्रेयसीची हत्या
कुटुंबियांनी 27 जानेवारीला भरतपूर पोलीस स्टेशनमध्ये तिची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरु केला, पण अनेक महिने कोणताही पुरावा सापडला नाही. कुटुंबीय न्यायासाठी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षला भेटले. पण तरीही त्यांना न्याय मिळाला नाही, असा दावा त्यांनी केला. पण कहाणीत ट्वीस्ट तेव्हा आला, जेव्हा पोलिसांना काही इलेक्ट्ऱनिक पुरावे सापडले.
हे ही वाचा >> कोल्हापूर: तुमचंही काळीज जाईल पिळवटून, चिमुकला धावत आईकडे आला अन् कुशीतच घेतला शेवटचा श्वास, नेमकं काय घडलं?
तपासात समोर आलं की, मीताचं मोबाईल आणि एटीएम कोणीतरी दुसरा व्यक्ती वापरत आहे. पोलिसांनी कसून तपास केला आणि देबाशीष बिसोई नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलं. देबाशीष-मीताचा प्रियकर होता. पोलीस आयुक्त सुरेश देवदत्त सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास केल्यानंतर देबाशीषने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं की, त्याला संशय होता की, मीताचं दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरु आहे. या संशयामुळे त्याने खतरनाक कट रचला.
हत्येनंतर आरोपी प्रेयसीचा फोन वापरायचा
हत्येच्या दिवशी म्हणजेच 24 जानेवारी रोजी देबाशीषने मीताला खुर्दा येथे तापंग परिसरात घेऊन गेला. तिथे त्याने गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह खड्ड्यात फेकला. त्यानंतर त्याने मीताचा मोबाईल आणि एटीएमचा वापर केला. अनेक दिवस त्याने पोलिसांना चकवा दिला. पण फोन लोकेशन आणि एटीएमचा वापर केल्याने अखेर त्याचा पर्दाफाश झाला.
हे ही वाचा >> झुडपात अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह! त्या अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
