तरुणीने दिला 'त्या' गोष्टीला नकार, तरुणाने थेट तरुणीचं नाकच कापलं अन्...

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मुलीने लग्नासाठी नकार दिल्याने, तरुण संतापला आणि त्याने रागाच्या भरात तरुणीचं नाकच कापून टाकल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

संतापलेल्या तरुणाने तरुणीचं नाकच कापलं अन्...

संतापलेल्या तरुणाने तरुणीचं नाकच कापलं अन्...

मुंबई तक

06 Sep 2025 (अपडेटेड: 06 Sep 2025, 01:23 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने केला चाकूने वार

point

रागाच्या भरात तरुणीेचं नाकच कापलं अन्...

Crime News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना भोपाळच्या गांधीनगर परिसरात घडल्याची माहिती आहे. येथे एका तरुणाने कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीला लग्नाची मागणी घातली पण, संबंधित तरुणीने त्याला लग्न करण्यास नकार दिला. मुलीने नकार दिल्याने, तरुण संतापला आणि त्याने रागाच्या भरात तरुणीचं नाकच कापून टाकलं. दिनेश असं आरोपीचं तरुणाचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

तरुणीचं नाकच कापलं  

पोलीस आरोपीच्या शोधात असल्याची माहिती आहे. आरोपी दिनेश बऱ्याच दिवसांपासून पीडितेवर लग्न करण्यासाठी दबाव आणत असल्याचां आरोप आहे. मात्र, संबंधित तरुणाने लग्नासाठी नकार दिल्याने आरोपी संतापला आणि त्याने रागाच्या भरात पीडितेवर चाकूने वार करत तिचं नाकच कापलं. पीडितेच्या तक्रारीवरून, तरुणी 12 वी उत्तीर्ण आहे. पीडिता आपल्या कुटुंबासोबत गांधीनगर परिसरात राहते.

कॉलेजला जाताना पीडितेला अडवलं अन् 

आरोपी सुद्धा पूर्वी गांधीनगरमध्ये राहत होता आणि आता तो सिहोर येथे राहतो. ही घटना गुरुवारी (4 सप्टेंबर) घडल्याची माहिती समोर आळी आहे. पीडित मुलीचा आरोप आहे की, आरोपी गुरुवारी दुपारी 12 वाजता भोपाळहून सिहोरला जात होता आणि पीडिता गांधीनगरमधील तिच्या कॉलेजमध्ये जात होती. तरुणी एअरपोर्ट ब्रिजवर पोहोचताच आरोपी मागून स्कूटीवर आला आणि तिला अडवलं. त्यानंतर त्याने पीडितेला जबरदस्तीने त्याच्या स्कूटीवर बसवलं आणि तिच्याशी बोलण्यासाठी आयटी पार्कमध्ये घेऊन गेला.

हे ही वाचा: IPS अंजना कृष्णा यांना 'इतना डेरिंग...' असं म्हणणाऱ्या अजितदादाचं स्पष्टीकरण, म्हणाले.. 'मला तर महिला अधिकाऱ्यांचा सर्वोच्च आदर..'

लग्न करण्यासाठी दबाव 

तिथे पोहोचल्यानंतर आरोपीने स्कूटीच्या डिक्कीमधून चाकू काढला आणि त्याने तरुणीवर त्याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरूवात केली. त्यावेळी पीडितेने आरोपीला स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करणार नाही.” मात्र, हे ऐकून आरोपी तरुणाला राग आला आणि त्याने रागाच्या भरात पीडितेचं नाकच कापलं. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पीडित तरुणी तिथेच वेदनेने कळवळत राहिली आणि तिने आपल्या आईला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला.

हे ही वाचा: अरुण गवळी मिल कामगार ते अंडरवर्ल्ड डॉन.. दाऊदला नडणाऱ्या 'डॅडी'ची खतरनाक कहाणी

यानंतर, पीडितेची आई तिच्या भावासोबत लगेच घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर पीडितेला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचारानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

    follow whatsapp