कोरियन गेम खेळणाऱ्या मुलींच्या वडिलांचा मेहुणीशी दुसरा विवाह, दोघीही सोबतच... कुटुंबाची हिस्ट्री आली समोर

मुंबई तक

• 04:25 PM • 04 Feb 2026

Crime News : भारत सीटी सोसायटीत उशीरा रात्री 3 वाजता अल्पवयीन बहीण निशिका, प्राची आणि पाखी यांनी इमरतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. या मुली कोरियन लवर गेम खेळत होती आणि त्यांना या खेळाची सवय लागली होती. पोलीस सर्वच बाजूने हे प्रकरण हाताळण्याचे काम करत आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कोरियन लवर गेम खेळणाऱ्या मुलीच्या वडिलांचा मेहुणीशी विवाह

point

कौटुंबिर हिस्ट्री आली समोर

Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील भारत सीटी सोसायटीत उशीरा रात्री 3 वाजता अल्पवयीन बहीण निशिका, प्राची आणि पाखी यांनी इमरतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. या मुली कोरियन लवर गेम खेळत होती आणि त्यांना या खेळाची सवय लागली होती. पोलीस सर्वच बाजूने हे प्रकरण हाताळण्याचे काम करत आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित मुलींच्या वडिलांनी 2 विवाह केले होते. त्या दोघीही एकाच घरात राहत होत्या. 3 मुलींसह इतरही 2 मुलं आहेत, ते सर्वच एकाच घरत राहतात. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जुळ्या मुली जन्माला आल्याचा मनात राग, नवऱ्यासह सासऱ्याने सुनेला संपवलं, मन हेलावणारी घटना

कोरियन लवर गेम खेळणाऱ्या मुलीच्या वडिलांचा मेहुणीशी विवाह

घटनेनुसार, मृत्यू पावलेल्या मुलींच्या वडिलांनी लग्न केले, पण मुल होत नसल्याने नवऱ्याने आपल्याच बायकोच्या लहान बहिणीशी म्हणजेच मेहुणीशी विवाह केला आणि त्यांना तिघांना जन्म दिला. पहिल्या बायकोपासून 2 मुलं होती. एकूण पाच मुलं आणि दोन पत्नी आणि पती असा त्यांचं कुटुंब होतं. 

हे ही वाचा : आईच्या प्रियकराला भर रस्त्यात भोसकलं; छातीवर पाय ठेऊन पोलिसांना फोन, तरुणानं कशाचा बदला घेतला?

कोरियन लवर गेम मुलींसाठी विश्व

दरम्यान तिघांचा मृत्यू झालेल्या मुलींपैकी 2 मुली या एकाच आईच्या होत्या, तर एक उर्वरित मुलगी ही एका दुसऱ्याच आईची होती. कुटुंब म्हणून ते सर्वजण एकत्र राहत होते. मृत मुली या गेली दोन वर्षांपासून शाळेत जात नव्हत्या. तिन्ही बहिणी या शिक्षणात फार हुशार नव्हत्या, त्या घरात बांधून ठेवल्यासारखं जीवन जगत होत्या.  त्या मुलींच्या बाहेरच्या जगाशी तसा फार काही संबंध नव्हता.  कोरियन लवर गेम हे त्यांचे एक विश्व बनले होते. पण याच एका गेममुळे तिघींचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले.