Murder Case: राजस्थानमधील प्रतापगड (Rajsthan Pratapgad) जिल्ह्यात एकाला महिलेला नराधमांपासून वाचवणे महागात पडले आहे. कारण काही जणांनी त्यांचीच हत्या (Murder) केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक (Arrested) केली आहे. मित्राबरोबर कपडे खरेदीसाठी गेलेल्या मित्राचा हकनाक जीव गेल्याने आता अनेक सवालही उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास अगदी बारकाव्याने सुरु केल आहे.
ADVERTISEMENT
मुलगा घरी आलाच नाही
ही घटना घडली आहे 11 नोव्हेंबर रोजी. वाजपुरा ग्रामपंचायतीच्या नटेला लिलवा फाळामधील रहिवासी नारायण लाल मीना यांनी त्यांचा मुलगा दिनेश मीना बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा 11 नोव्हेंबर रोजी त्याच्या मित्रासोबत तो कपडे खरेदीसाठी गेला होता. त्यानंतर त्याचा मित्र घरी आला मात्र दिनेश घरी परतलाच नाही.
मित्राने सत्य लपवलं
दिनेश घरी परतला नसल्यामुळे कुटुंबीयांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्याच्या मित्रांकडेही दिनेशची चौकशी करत तो घरी का आला नाही तेसुद्धा त्यांनी मित्रांना विचारले. त्यावेळी मित्राने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर पोलिसांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर दोनच दिवसांनी माण गावातील नदीत दिनेशचा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांना सोशल मीडियावरून मिळाली.
हे ही वाचा >> Dombivali Crime : दगडाने ठेचलं डोकं, मित्रानीच संपवलं; हत्येचे कारण तपासातून आलं समोर
नराधमांनी केला पाठलाग
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी पहिल्यांदा दिनेशच्या मित्रांकडे चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना समजले की, दिनेश आणि त्याचा मित्र नांगला हे एका महिलेसोबत रात्रीच्या वेळी दुचाकीवर नटेला गावामध्ये येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. तर त्याचवेळी माना गावाकडून गोपाळपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीने आलेल्या 3 तरुणांनी त्यावेळी त्यांचा पाठलाग केला होता. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या लोकांनी दिनेशच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला होता.
अन् तो नदीत कोसळला
त्यावेळी दुचाकीवरून त्याचा तोल जाऊन तो नदीत पडला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी पळ काढला. त्यानंतर दिनेशच्या मित्रही प्रचंड घाबरला होता. त्यावेळी हे प्रकरण लपवून ठेवण्यासाठी त्याने कोणाला हे प्रकरण सांगितले नाही. हे प्रकरण त्याने दोन दिवस तसेच लपवून ठेवले होते.
बलात्कार करण्यासाठी हत्या
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक अमित कुमार यांनी सांगितले की, तपासादरम्यान आरोपींचा शोध घेण्यात आला. दिनेशच्या मित्राने सांगितलेल्या माहितीच्या आधारे दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. तर यामधील एक जण फरार असल्याचेही त्यांनी सांगितले. तपास केल्यानंतर भगवान आणि होमला या दोन आरोपींनी सांगितले की, दिनेश आणि नांगला यांच्याबरोबर असलेल्या महिलेवर बलात्कार करण्यासाठी त्या तिघांनी पाठलाग केला होता. त्याचवेळी दिनेशच्या डोक्यात त्यांनी लोखंडी रॉडने वार केल्याने दुचाकीवरून जाताना त्याचा तोल गेला आणि तो नदीत पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
