प्रेयसीची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह पोत्यात भरला अन् 'त्या' ठिकाणी फेकला... हत्येमागचं नेमकं कारण काय?

एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह पोत्यात भरून शेजाऱ्याच्या घराजवळ फेकून दिल्याचं वृत्त आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या घराची मालकीण झोपेतून उठली तेव्हा तिला एक पोतं बाहेर पडलेलं आढळलं.

प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेह पोत्यात भरला अन्...

प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेह पोत्यात भरला अन्...

मुंबई तक

• 05:11 PM • 24 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराने केली प्रेयसीची निर्घृण हत्या...

point

नंतर मृतदेह पोत्यात भरला अन् 'त्या' ठिकाणी फेकला...

Crime News: राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह पोत्यात भरून शेजाऱ्याच्या घराजवळ फेकून दिल्याचं वृत्त आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या घराची मालकीण झोपेतून उठली तेव्हा तिला एक पोतं बाहेर पडलेलं आढळलं. ते पोतं उघडून पाहिल्यानंतर त्यात रक्ताने माखलेला तरुणीचा मृतदेह सापडला. 

हे वाचलं का?

त्यानंतर, लगेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा तपास सुरू केला. केवळ 4 तासांतच या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, जितेंद्र सिंग उर्फ राहुल नावाच्या तरुणाने त्याची प्रेयसी बबीताची हत्या केली. आरोपीच्या चौकशीदरम्यान, बरेच धक्कादायक खुलासे समोर आले. 

पोत्यात तरुणीचा मृतदेह... 

संबंधित प्रकरण हे शास्त्रीनगर परिसरातील असल्याची माहिती आङे. मंगळवारी सकाळी एका घराच्या बाहेर पोतं आढळलं. ते पाहून त्या घराच्या मालकिणीला मोठा धक्का बसला. त्यात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि बबिता शर्मा अशी मृत तरुणीची ओळख समोर आली. या प्रकरणाच्या तपासासाठी श्वान पथक बोलवण्यात आलं. तपासादरम्यान, श्वान नेहमी त्या शेजारच्या घराजवळ फेऱ्या मारत असल्याने पोलिसांना संशय आला. 

हे ही वाचा: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, सॉफ्टवेअर इंजीनिअरचं रागाच्या भरात भयानक कृत्य! पत्नीला भररस्त्यात अडवलं अन्...

आरोपीने केला गुन्हा कबूल 

पोलिसांनी त्या घराच्या मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, ते घर एका जितेंद्र सिंग नावाच्या तरुणाचं असून त्याने नुकतंच ते विकून टाकलं होतं. सध्या, त्या घरात कोणीच राहत नव्हतं. पोलिसांनी त्वरीत जितेंद्रला ताब्यात घेतलं आणि त्याची कठोर चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी जितेंद्र म्हणाला, "मी सुभाष कॉलनीत राहतो. बबिता माझी मैत्रीण होती. माझा तिच्याशी काही काळापासून आर्थिक वाद सुरू होता. ती मला सतत पैशांसाठी त्रास देत होती. त्यामुळेच मी माझं घर विकलं. मी बबिताला कंटाळलो होतो. खरं तर, मी माझं घर विकलं असलं तरी माझ्याकडे त्याची एक चावी होती. मी याच घरात बबिताची हत्या करण्याचं ठरवलं आणि ती घर मी विकून टाकल्याने माझ्यावर कोणाला संशय सुद्धा येणार नाही." 

आरोपी पुढे म्हणाली की, "मी 21 डिसेंबर रोजी बबिताला माझ्या घरी बोलवलं आणि माझ्या सांगण्यावरून ती आली. त्यावेळी, मी धारदार शस्त्राने बबिताचा गळा चिरला आणि तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर, मी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅन बनवला. मी तिचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि रात्रीच्या अंधारात मी ते पोतं मुन्नी देवीच्या घराबाहेर फेकलं." सध्यास आरोपी राहुल पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. तरुणीच्या नातेवाईकांशी सुद्धा संपर्क साधला जात असून या प्रकरणासंदर्भात पुढील कारवाई केली जात आहे. 

    follow whatsapp