पत्नीच्या चारित्र्यावर संशय, सॉफ्टवेअर इंजीनिअरचं रागाच्या भरात भयानक कृत्य! पत्नीला भररस्त्यात अडवलं अन्...

एका 40 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअरने आपल्या पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी पतीने पत्नीच्या हत्येनंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

सॉफ्टवेअर इंजीनिअरचं पत्नीसोबत भयानक कृत्य!

सॉफ्टवेअर इंजीनिअरचं पत्नीसोबत भयानक कृत्य!

मुंबई तक

• 10:19 AM • 24 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन्...

point

सॉफ्टवेअर इंजीनिअरचं रागाच्या भरात भयानक कृत्य!

Crime News: बंगळुरूमध्ये एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे मंगळवारी (23 डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास एका 40 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअरने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी पतीने पत्नीच्या हत्येनंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

हे वाचलं का?

पत्नीवर चार गोळ्या झाडल्या अन्... 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भुवनेश्वरी (39) नावाची एक महिला 'यूनिअन बँक ऑफ इंडिया'च्या बसवेश्वरननगर ब्रांचमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होती. कामावरून घरी परतत असताना आरोपी पती बालामुरुगनने तिला संध्याकाळी 6.30 ते 7 दरम्यान, मगाडी रोडजवळ तिला वाटेत थांबवलं. त्यानंतर, त्याने आपल्या पत्नीवर पिस्तूलमधून चार गोळ्या झाडल्या. यामध्ये, पीडिता गंभीररित्या जखमी होऊन जमिनीवर कोसळली आणि तिला तातडीने शानबाग रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे पोहोचल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं. 

हे ही वाचा: दोन सख्ख्या बहिणी अचानक रहस्यमयरित्या गायब... 'तो' एक पुरावा अन् सगळं उघडकीस! नेमकं प्रकरण काय?

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वाद 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत महिलेचं 2011 मध्ये लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत. परंतु, लग्नानंतर काही महिन्यांत त्यांच्यात सतत वाद होऊ लागले आणि त्यामुळे ते जवळपास 18 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. आरोपीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे, पतीपासून दूर राहण्यासाठी पीडित भुवनेश्वरी सहा महिन्यांपूर्वी व्हाइटफील्ड येथील राजाजीनगरमध्ये शिफ्ट झाली. 

हे ही वाचा: नवरा-बायको एकत्रच गेले बाथरूममध्ये, बंद दाराआड नेमकं घडलं तरी काय की दोघांचाही गेला जीव?

पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध केला गुन्हा दाखल 

एका आठवड्यापूर्वीच आरोपी बालामुरुगनने भुवनेश्वरीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी तिला कायदेशीर नोटिस पाठवली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याआधी एका प्रायव्हेट आयटी फर्ममध्ये काम करत होता. मात्र मागील चार महिन्यांपासून त्याला कुठेच काम न मिळाल्याने तो बेरोजगार होता. पत्नीच्या हत्येनंतर, आरोपी बालामुरुगन मगाडी रोड पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपला गुन्हा कबूल केला. यासोबतच, त्याने पत्नीच्या हत्येत वापरलेली पिस्तूल सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिली. या प्रकरणासंदर्भात, पोलिसांनी BNS सेक्शन 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp