होणाऱ्या नवऱ्याच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीचा फोटो पाहिला... संतापलेल्या तरुणीच्या कृत्यामुळे होत्याचं नव्हतं झालं

मुंबई तक

14 Feb 2026 (अपडेटेड: 14 Feb 2026, 03:44 PM)

एका अल्पवयीन तरुणीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुण त्याच्या होणाऱ्या सासरच्या घरी गेल्यानंतर, त्याच्यासोबत ही भयानक घटना घडली.

तरुणीच्या कृत्यामुळे होत्याचं नव्हतं झालं...

तरुणीच्या कृत्यामुळे होत्याचं नव्हतं झालं...(AI फोटो)

Google CTA

बातम्या हायलाइट

point

होणाऱ्या नवऱ्याच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीचा फोटो पाहिला...

point

संतापलेल्या तरुणीच्या कृत्यामुळे होत्याचं नव्हतं झालं

Crime News: मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एका अल्पवयीन तरुणीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुण त्याच्या होणाऱ्या सासरच्या घरी गेल्यानंतर, त्याच्यासोबत ही भयानक घटना घडली. पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतलं असून तिला न्यायलयात सादर करण्यात आलं आहे. 

हे वाचलं का?

होणाऱ्या नवऱ्याची गळा दाबून हत्या... 

संबंधित घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. पीडित तरुण आपल्या होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. दरम्यान, आरोपी तरुणीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या मुलीचा फोटो दिसला आणि त्यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, तरुणीने तिच्या होणाऱ्या पतीचा विजेच्या वायरच्या साहाय्याने गळा दाबून तिची हत्या केली. दुसऱ्या दिवशी, सकाळच्या सुमारास तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या गळ्यावरील खुणांच्या आधारे, पोलिसांनी हत्येची शक्यता वर्तवली. तपासादरम्यान, पोलिसांना तरुणाच्या होणाऱ्या पत्नीवर संशय आला आणि तिची कठोर चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: देशातील पहिला ग्रीन फील्ड कोस्टल रोड... आता वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा!

मृताचं नाव सुनील (20 वर्षे) असून त्याचं अल्पवयीन तरुणीसोबत लग्न ठरलं होतं. तो बुधवारी रात्रीच्या सुमारास तिला भेटण्यासाठी गेला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा गावात मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तपासादरम्यान, मृतदेहावरील खुणांच्या आधारे पोलिसांना हत्येचा संशय आला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सर्व बाजूंनी घटनेचा तपास सुरू केला. अखेर, चौकशीदरम्यान आरोपी तरुणीने तिचा गुन्हा कबूल केला. 

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी तरुणीला ताब्यात घेऊन तिला न्यायालयात सादर करण्यात आलं. पोलिसांनी हत्येत वापरण्यात आलेली विजेची वायर आणि इतर पुरावे देखील ताब्यात घेतले. सध्या, पोलीस हत्येमागच्या इतर कारणांचा शोध घेण्यासाठी तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.