आईचे दागिने दिले, तरीही प्रेयसीने छळ थांबवला नाही; व्हॅलेंटाईन्स डे दिवशी प्रेयसीची चिठ्ठी अन् 17 वर्षीय मुलाने घेतला 'हा' निर्णय

Crime News : संपूर्ण देशात तरुण पिढी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना, तिकडे प्रयागराजमध्ये एका प्रेमसंबंधांचा अतिशय भयानक अंत झाला आहे. येथील एका 17 वर्षीय तरुणाने प्रेयसीसोबत झालेल्या वादातून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. मृत तरुण हा हॉकी खेळाडू होता आणि एनडीएची तयारी करत होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 05:34 PM • 14 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आईचे दागिने दिले, तरीही प्रेयसीने छळ थांबवला नाही

point

व्हॅलेंटाईन्स डे दिवशी 17 वर्षीय मुलाने घेतला 'हा' निर्णय

Crime News : संपूर्ण देशात तरुण पिढी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना, तिकडे प्रयागराजमध्ये एका प्रेमसंबंधांचा अतिशय भयानक अंत झाला आहे. येथील एका 17 वर्षीय तरुणाने प्रेयसीसोबत झालेल्या वादातून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. मृत तरुण हा हॉकी खेळाडू होता आणि एनडीएची तयारी करत होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई उच्च न्यायालयाने स्मृती मानधनाच्या मित्राला झापलं, पलाश मुच्छलबाबत मानहानीकारक वक्तव्य करण्यास सक्त मनाई

चिठ्ठीमुळे खळबळ 

आशुतोष प्रताप गिरी उर्फ अमन असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यातील मजकुराने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्या चिठ्ठीत लिहिले होते की, 'मी तुझ्यावर खूप प्रेम करते. पण आता तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला माफ कर, तू मेलास तरी मला काही फरक पडत नाही.' आशुतोषच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, एका कोचिंग क्लासमध्ये ओळख झालेल्या प्रतापगडच्या तरुणीसोबत त्याचे गेल्या आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते.

मारहाण आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप

मृताच्या बहिणीने प्रेयसीवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या मते, संबंधित तरुणीचे दुसऱ्या मुलाशी संबंध निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. आठवड्यापूर्वी तरुणीच्या मित्रांनी आशुतोषला मारहाण करून त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला होता. एवढेच नाही तर ती त्याला ब्लॅकमेल करत होती आणि आशुतोषने त्याच्या आईचे अनेक दागिनेही तिला नेऊन दिले होते, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.

हे ही वाचा : जामखेड : 'आमच्या भावाने मुलीला पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले?', तिघांनी मिळून केला एकाचा खून

पोलिसांकडून तपास सुरू

आशुतोषच्या नातेवाईकांनी याप्रकरणी प्रेयसी आणि तिच्या मित्रांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. आशुतोषचे पाय जमिनीला टेकलेले असल्याने नातेवाईकांनी या आत्महत्येबाबत संशयही व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
 

    follow whatsapp