प्रेयसीच्या हत्येचा आरोप, तरुणाने असह्य होऊन स्वत:लाच संपवलं! आत्महत्येपूर्वी पँटच्या खिशावर लिहिलं की...

प्रेयसीच्या मृत्यूनंतर एका सौरभ नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. गंभीर आरोपामुळे सौरभ नैराश्यात होता आणि यातून त्याने स्वत:लाच संपवलं. आता, सौरभच्या आत्महत्येमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण आलं आहे.

असह्य होऊन प्रियकराने स्वत:लाच संपवलं!

असह्य होऊन प्रियकराने स्वत:लाच संपवलं!

मुंबई तक

• 06:00 PM • 25 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणावर प्रेयसीच्या हत्येचा आरोप...

point

तरुणाने असह्य होऊन स्वत:लाच संपवलं!

point

आत्महत्येपूर्वी पँटच्या खिशावर लिहिलं की...

Crime News: उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे प्रेयसीच्या मृत्यूनंतर एका तरुणाने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. मृत तरुणीचं नाव स्नेहा असून तिची हत्या करण्यात आली होती. पीडितेचे आंबेडकर नगरच्या पदुमपूर गावात राहणाऱ्या सौरभ नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि त्याच्यावर स्नेहाच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता. या गंभीर आरोपामुळे सौरभ नैराश्यात होता आणि यातून त्याने स्वत:लाच संपवलं. आता, सौरभच्या आत्महत्येमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण आलं आहे. 

हे वाचलं का?

मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली अन्..   

2 डिसेंबर रोजी, आंबेडकर नगरमधील नसरुद्दीनपट्टी गावातून स्नेहा नावाची एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. 4 डिसेंबर रोजी, मुलीच्या कुटुंबियांनी राजेसुल्तानपूर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. प्रकरणाची तक्रार नोंदवल्यानंतर सुमारे 15 दिवसांनी, घरापासून फक्त 100 मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह सापडला. त्यावेळी, मुलीच्या कुटुंबियांनी स्नेहाचा प्रियकर सौरभवर तिच्या हत्येचा आरोप लावला. 

हे ही वाचा: पतीच्या मृत्यूनंतर दिरासोबत प्रेमसंबंध! पण, एके दिवशी ऊसाच्या शेतात बोलवून केला गेम अन्...

प्रेयसीच्या हत्येचा आरोप

पोलिसांकडून या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच 24 डिसेंबर रोजी सौरभने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. अतरौलियाच्या नदनपूर गावात सौरभचा मृतदेह आढळला. स्वत:ला संपवण्यापूर्वी त्याने आपल्या पँटच्या खिशावर लिहिलं की, "मी स्नेहाचा खून केलेला नाही." यापूर्वी, स्नेहाचा विनयभंग केल्याप्रकरणी सौरभला तुरुंगात जावं लागलं होतं आणि काही दिवसांपूर्वीच, तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती! तात्काळ काम थांबवण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश...

या हत्याप्रकरणाचा उलगडा अद्याप झाला नसून सौरभ नव्हे तर, आणखी कोणी स्नेहाची हत्या केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच या घटनेचा उलगडा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

    follow whatsapp