चोरीच्या उद्देशाने दोन तरुण घरात शिरले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीला पाहून हैवान बनले, बलात्कार करुन झाले पसार

Crime News : दोन नराधम तरुणांनी एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत असताना हे दोघे तरुण गावातील एका घरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरले. यावेळी आई-वडिलांसोबत झोपलेल्या सहा वर्षाच्या चिमुरडीला बघून त्यांची वासना जागृत झाली. याप्रकरणी पोलिसांनी अमित जैन (वय 20) आणि रोहन जैन (वय 19) या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

08 Mar 2026 (अपडेटेड: 08 Mar 2026, 04:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चोरीच्या उद्देशाने घरात शिरले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीला बघून हैवान जागा झाला

point

बलात्कार करुन पळाले

point

धक्कादायक प्रकरण

Crime News : दोन नराधम तरुणांनी एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत असताना हे दोघे तरुण गावातील एका घरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरले. यावेळी आई-वडिलांसोबत झोपलेल्या सहा वर्षाच्या चिमुरडीला बघून त्यांची वासना जागृत झाली. याप्रकरणी पोलिसांनी अमित जैन (वय 20) आणि रोहन जैन (वय 19) या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'तु मला आवडतेस', म्हणत जालन्यात सासऱ्याने सुनेला मागून मिठीत धरले, नंतर खाली पाडून...

चोरीच्या उद्देशाने घरात शिरले अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, कांकेर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात 6 मार्चच्या रात्री सहा वर्षांची मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत घरात झोपली होती. त्याच वेळी दोन तरुण नशेच्या धुंदीत चोरीच्या उद्देशाने घरात घुसले, मात्र चिमुरडीला पाहून त्यांच्यातील वासना जागृत झाली. त्या नराधमांनी मुलीचे अपहरण करून तिला गावातील तलावाजवळ नेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून दोघेही पसार झाले. रात्री साडेबाराच्या सुमारास जेव्हा पालकांना जाग आली, तेव्हा मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घर आणि परिसरात शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

आरोपींनी गुन्हा मान्य केला

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच शोधमोहीम राबवली आणि मुलीला तलावाजवळील शेतातून बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. तिला तातडीने कांकेर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी गावात तपास करून चार संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती अमित जैन आणि रोहन जैन या दोन आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश साहू यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा : बलात्कार पीडितेकडे गावाला मटण अन् दारुची पार्टी देण्याची मागणी, पंचायतीचा अजब निर्णय; पोलिस काय करताहेत?

कठोर शिक्षेची मागणी

या संतापजनक घटनेनंतर गावात आणि परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप मुलीवर अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित पावले उचलल्यामुळे आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्यात यश आले आहे. सध्या पोलीस अधिक पुरावे गोळा करत असून पीडितेच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. या घटनेमुळे संपूर्ण कांकेर जिल्हा हादरला असून महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
 

    follow whatsapp