महिला करत होती अंघोळ, तरुणाने खिडकीतून सारं चित्र मोबाईमध्ये केलं कैद, पीडितेनं पाहताच....

crime news : माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका तरुणाने एका महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला.

woman during bathing

woman during bathing

मुंबई तक

16 Sep 2025 (अपडेटेड: 16 Sep 2025, 12:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना

point

महिला अंघोळ करताना तरुणाने व्हिडिओ केला शूट

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका तरुणाने एका महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडिओ शूट करताना महिलेनं त्या तरुणाला बघितले असता, तरुण घटनास्थळावरून पळून गेला. महिलेनं या घडलेल्या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली, तसेच त्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्श शिंदे यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली

नेमकं 'त्या' रात्री काय घडलं? 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता घडली होती. पीडित महिला किराणा दुकान चालवते आणि रात्री दुकान बंद करून घरी परतली होती. बाथरूममध्ये गीझरमधून पाणी भरत असताना, तिच्या फोनवर संपर्क साधला आणि नंतर ती काही वेळानं घराबाहेरील हॉलवर आली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या, जेव्हा परत आली तेव्हा तिला बाथरूमच्या खिडकीजवळ एक तरुण मोबाईल फोन धरून तिला व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्यानंतर ती महिला आरडाओरड करू लागली असता तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला होता. महिलेचा आरडाओरड पाहून काही लोक घराबाहेर आले आणि त्यांनी रस्त्यावरून एका तरुणला घराकडे धावताना बघितले. यानंतर पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा : वसतिगृहात 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला नग्न करत सार्वजनिक ठिकाणी नाचणास भाग पाडलं, नंतर थंड पाणी ओतून... रॅगिंग अजूनही सुरुच?

महिलेचा व्हिडिओ...

पोलिसांनी तरुणाविरुद्ध व्हियुरिझम आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला. तपासातून असे दिसून आले की, आरोपी तरुण त्याच परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. तसेच नंतर तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी असेही म्हटलं की, आरोपीच्या फोनमध्ये दुसरा तिसरा कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ आढळला नाही आणि त्याने महिलेला व्हिडिओ देखील डिलीट केला.

    follow whatsapp