Crime News : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. एका 75 वर्षीय वृद्धाने एका 35 वर्षीय महिलेशी विवाह केला. त्यानंतर त्या वृद्ध पतीने आपल्या पत्नीसोबत हनिमून केलं आणि हनिमूनच्या दुसऱ्याच दिवशी वृद्ध पतीचा मृत्यू झाला. हनिमूनदरम्यान, सकाळीच तरुणाची अचानकपणे प्रकृती बिघडली आणि वृद्धाला वाचवता आले नाही. अशातच आता वृद्धाच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे. वृद्ध पतीचं नाव संगरु राम असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पंकजा मुंडेंच्या दसऱ्या मेळाव्यात वाल्मिक कराडच्या पोस्टरबाजीची चर्चा, पोस्टरवरील आशयाने वेधलं लक्ष
वृद्धाच्या मृत्यूचं खरं कारण समोर
संगरु रामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटुंबियांकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर पोस्टमॉर्टमच्या अहवालात संगरु रामच्या मृत्यूचे खरं कारण समोर आलं आहे. शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये संगरु रामला विजेचा झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं नमूद केलं आहे. जौनपूरमधील गौराबादशाहपूर पोलिस स्टेशनचे स्टेशन इन्चार्ज प्रवीण यादव यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टला दुजोरा दिला.
मिळालेल्या एकूण माहितीनुसार, संगरु राम यांच्या पत्नीचे अवघ्या एक वर्षापूर्वी निधन झाले होते. तिच्या मृत्यूनंतर ते एकटे पडले. दरम्यान, 35 वर्षीय मानभावती संगरु राम यांच्याशी विवाह झाला होता आणि त्यांचा दुसराही विवाह झाला होता. त्यांना तीन मुलं होती, या लग्नासाठी संगरु राम यांनी 5 बिघा जमीन 5 लाख रुपयांना विक्री केली.
हे ही वाचा : उल्हासनगरमध्ये नवरात्रोत्सवात बंदुक रोखत गोळीबार, हल्लेखोर म्हणाला, 'मी इथला भाई...' नेमकं काय घडलं?
संगरु रामच्या मृत्यूनंतर, महिलेनं सांगितलं की, तिला लग्नाला कसलाही रस नाही. पण तिला वाटले की संगरु राम तिच्या तीन मुलांची जबाबदारी पेलेल. तिने असेही स्पष्ट केलं की, कोर्ट मॅरेज आणि लग्नानंतर त्यांनी लग्नाच्या रात्री मन भरून गप्पा मारल्या. त्यानंतर त्याची तब्येत खालावली असता, त्यांना रुग्णालयात नेले, परंतु तो मरण पावला होता.
ADVERTISEMENT
