Crime News : देशात महिला आणि मुलींसह तरुणींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडू लागलेल्या आहेत. आरोपीने 16 वर्षीय पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपीने पीडितेला दगडाने ठेचून ठार केलं, नंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी वस्तू टाकल्याचा मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीनसह पाच मुलांना अटक केली. पोलिसांनी आरोप केला की, प्राथमिक तपास केल्यानंतर लव्ह ट्रँगलचं प्रकरण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. ही घटना आसामच्या हेलाकांडी जिल्ह्यातील असल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : खाकी वर्दीला काळिमा! पोलीस कॉन्स्टेबलकडून स्मशानभूमीत 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
पीडित मुलगी घरात मृतावस्थेत
पीडित मुलगी ही घरात मृतावस्थेत आढळून आली होती. तिचे कुटुंब जेवणासाठी शेजारील एका घरात गेले होते. पोलिसांनी सांगितलं की, मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालाचा तपास केल्यानंतर हत्येपूर्वी पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचं दिसून येतंय. अमिताभ सिन्हाने सांगितलं की, सोमवारी एका अल्पवयीन मुलासह तीन तरुणांचा या प्रकरणात समावेश होता. त्यांना पोलिसांनी अटक करून सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मनोज दास उर्फ राजदीप दास (वय 23) आणि सिराज दास (वय 18) या दोघांना अटक केली होती.
अल्पवयीन मुलासह तीन किशोरवयीन मुलांना अटक
पोलिसांनी सांगितलं की, आम्ही एका अल्पवयीन मुलासह तीन किशोरवयीन मुलांना अटक केली होती. बुधवारी सकाळी आम्ही आणखी दोघांना अटक केली, असे सिन्हा म्हणाले होते. एसएसपींच्या म्हणण्यांनुसार, तपासकर्त्यांनी दावा केला की, पीडितेचे कथितरित्या दोन्ही आरोपींसोबत प्रेमसंबंध होते, हेच हत्येचे कारण असण्याची शक्यता आहे. त्यांचा असा दावा की, मुलीचे एकाच वेळी दोघांसोबत प्रेमसंबंध होते आणि हेच या हत्येमागील मुख्य कारण असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सिन्हा यांनी दिली.
कुटुंबाच्या म्हणण्यांनुसार, आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जेवणासाठी गेलो होतो. त्यासाठी आमची मुलगी देखील येणार होती. मात्र तिचा चुलत भावंडांशी किरकोळ वाद झाला होता. यानंतर मुलगी रुसली आणि तिने जेवणासाठी न येण्यास सांगितलं. आम्ही जेवण केलं, तिला काही तरी घरी घेऊन जाण्याचा विचार केला, मात्र घरी पोहोचताच भयंकर दृश्य दिसलं, असं मृत मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
हे ही वाचा : मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे, परीक्षा केंद्रात घुसून विद्यार्थ्यांची झडती
पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीच्या शिक्षेची मागणी केली. पीडितेच्या बहिणीने आरोप केला की, हल्लेखोरांनी नंतर मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न करून टाकला होता. संबंधित प्रकरणात पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता कलमान्वये 65(1), 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पॉक्सो अंतर्गत देखील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ADVERTISEMENT












