निळ्या ड्रममधील मृतदेह कचऱ्यात, हातावर नेहा नावाचा टॅटू..

Crime News : निळ्या ड्रममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या हत्येमुळे मेरठमधील सौरभ हत्याकांडासारखं प्रकरण नव्याने ताजं झालं आहे. तरुणीच्या मृतदेहावर टॅटू देखील आढळून आलं होतं.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 05:00 PM • 27 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नेहा नावचा हातावर टॅटू

point

निळ्या ड्रममध्ये तरुणीचा मृतदेह

Crime News : पंजाबच्या पटियालातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पटियालात निळ्या ड्रममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या हत्येमुळे मेरठमधील सौरभ हत्याकांडासारखं प्रकरण नव्याने ताजं झालं आहे. दरम्यान, पटियालाच्या डीसीडब्ल्यू ब्रिजजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेल्या निळ्या ड्रममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : डोंबिवली : 140 हून अधिक तरुणी प्रेमाच्या जाळ्यात, लाखोंची लुबाडणूक; तरुणानं कसं गंडवलं?

नेहा नावचा हातावर टॅटू

संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. प्राथमिक माहितीनुसार, ती तरुणी पंजाबची नव्हतीच, तसेच नेहा नावचा टॅटू तिच्या हातावर आढळून आला होता. महिला ड्रेममध्ये बंद करून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेल्या स्वरुपात आढळून आला होता. 

निळ्या ड्रममध्ये तरुणीचा मृतदेह

पटियाला डिसीडब्ल्यू ओव्हरब्रिजजवळ एका निळ्या ड्रममध्ये एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणीचा मृतदेह ड्रममध्ये कोंबून नंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आला. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळपणे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक अर्बन इस्टेट तपास सुरू केला. संबंधित महिला एक पर्यटक असल्याचे दिसून येते. तिच्या हातावरील टॅटू आधारे पोलिसांनी मृत तरुणीची पटवण्याचा प्रयत्न केला. 

फ्लायओव्हरनजीक असलेल्या एका निळ्या ड्रममध्ये मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या तपासादरम्यान मृत तरुणीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात तपासणी केली जात आहे. 

हे ही वाचा : मोठी बातमी... आदित्य ठाकरेंनी CM फडणवीसांना मध्यरात्री केला फोन, कोणाची काढली विकेट?

दरम्यान, पटियालाचे पोलीस अधिकारी एएसआय अमनदीप सिंग यांनी या घटनेची माहिती दिली. नंतर त्यांनी सांगितलं की, तरुणीचा मृतदेह हा ताब्यात घेऊन नंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणात पोलीस तिच्या हातावरील टॅटूच्या आधारे तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.