Crime News : बिहारच्या पश्चिम चंपारण्या जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिलेल्या माहितीनुसार इयत्ता आठवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला नग्न करून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण क्रूरतेचे कृत्य व्हिडिओत कैद केले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हे प्रकरण चंपारण्य जिल्ह्यातील मझौलिाय येथे घडली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : विवाहित महिलेला प्रपोज केलं, नकार दिल्याने झोपल्यानंतर फेकलं अॅसिड, भयंकर प्रकरण!
आठवीच्या विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण
घडलेल्या घटनेनुसार, पीडित तेलिया पट्टी येथील अंशु प्रिया पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. तो शाळेत जाताना शाळेतून घरी परतताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही अज्ञातांनी मिळून त्याला मारहाण केली. एवढंच नाही तर आरोपींनी त्याचे कपडे काढून नग्न करत अंतर्वस्त्र ठेवून चप्पलांचा हार घालून बेदम मारहाण केली. नंतर या एकूण घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आणि अपलोड करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या लज्जास्पद घटनेनंतर परिसर हादरून गेला आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पीडिताने कुटुंबीयांना घटनेबाबतचा प्रकार सांगण्यास नकार दिला, मात्र पीडिताची प्रकृती खालावल्याने त्यांना या घटनेची माहिती पोहोचली. त्याला एका आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा : बापाच्या रिसॉर्टवर बोलावून 17 वर्षीय मुलीवर नको तेच, धनिकपुत्राचं मोठं कांड
संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणले. या घटनेनं प्रशासकीय विभाग हादरून गेला असून मझौलिया पोलीस ठाणे अधिकारी अमर कुमार यांनी सांगितलं की, व्हायरल व्हिडिओ आणि संपूर्ण पैलूंची गांभीर्यपणे चौकशी केली जात आहे. दोषींचा तपास केला जात असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.
ADVERTISEMENT











