मावशीकडे रहायला गेली अन् घडलं नको ते, रक्तस्राव झाल्यामुळे प्रकरण बाहेर; आरोपी कोण?

नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर तिच्याच सख्ख्या मावशीच्या नवऱ्याने (काकाने) अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 01:07 PM • 21 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मावशीकडे रहायला गेली अन् घडलं नको ते,

point

रक्तस्राव झाल्यामुळे प्रकरण बाहेर

point

आरोपी कोण?

Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर तिच्याच सख्ख्या मावशीच्या नवऱ्याने (काकाने) अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपीला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, सध्यातरी तिला बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पीडित मुलगी मूळची झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

मावशीकडे रहायची पीडिता

वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे आणि आई रोजगाराच्या निमित्ताने चेन्नई येथे राहत असल्याने, ही चिमुरडी आपल्या मावशीच्या घरी राहत होती. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने घरात मुलगी एकटी असल्याचे पाहून तिच्यावर सातत्याने अत्याचार करत होता. आरोपीने मुलीला भीतीच्या सावटाखाली ठेवले होते आणि कोणालाही काही सांगितल्यास जिवानिशी मारण्याची धमकी दिली होती. बुधवारी (20 मे) आरोपीने पुन्हा एकदा मुलीवर अत्याचार केला, ज्यानंतर प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली.

हे ही वाचा : मोठी बातमी : राज ठाकरेंना मोठा दिलासा, 'त्या' खटल्यातून निर्दोष मुक्तता

पीडितेला रुग्णालयात सोडून पळाला, पण..

परिस्थिती बिघडल्याचे पाहून आरोपीने मुलीला उपचारासाठी कुडू येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे मुलीला सोडून तो पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवत कुडू बसस्थानकावरून आरोपीला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पीडित मुलीच्या मावशीनेच आपल्या पतीविरुद्ध कैरो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वय सुमारे 30 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : अशी आई कुणालाही न मिळो! आठ महिन्यांच्या चिमुकलीसोबत काय केलं बघा...

पोलिसांनी काय सांगितले?

कैरो पोलीस ठाण्याचे प्रभारी कुंदन कुमार रवानी यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी जलद गतीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक (SP) सादिक अन्वर रिझवी यांनी सांगितले की, एका निष्पाप मुलीसोबत तिच्याच नातेवाईकाने हे दुष्कृत्य केले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास आणि पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.