अशी आई कुणालाही न मिळो! आठ महिन्यांच्या चिमुकलीसोबत काय केलं बघा...

मुंबई तक

घरात कुणीच नसताना आईने आपल्या आठ महिन्याच्या चिमुरडीला ॲसिड पाजले. यानंतर चिमुरडीच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. यामागे नेमकं काय कारण आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

अशी आई कुणालाही न मिळो!

point

आठ महिन्यांच्या चिमुकलीसोबत काय केलं बघा...

Crime News : राजस्थानच्या भिवडी भागातून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कॅप्टन चौक परिसरात एका निर्दयी आईने आपल्याच आठ महिन्यांच्या चिमुरडीला ॲसिड पाजल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या प्रकारानंतर निष्पाप बालिकेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून, तिला तातडीने अलवर येथील बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक तिच्यावर उपचार करत आहे.

मुलीला ॲसिड पाजण्यामागे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेचे वडील मोहित हे रोजच्याप्रमाणे आपल्या कामावर गेले होते. घटनेच्या वेळी घरात त्यांची पत्नी आणि आठ महिन्यांची मुलगी हे दोघेच उपस्थित होते. याच दरम्यान या महिलेने अज्ञात कारणावरून आपल्या पोटच्या मुलीला ॲसिड पाजले. मात्र, या आईने एवढे टोकाचे आणि क्रूर पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस सध्या सर्व बाजूंनी या घटनेचा कसून तपास करत आहेत.

हे ही वाचा : महिला पोलीस कॉन्स्टेबलवर लैंगिक अत्याचार, कुणी ओढलं जाळ्यात?

तोंडातून अन् नाकातूव रक्त

घटनेच्या काही वेळानंतर चिमुरडीची प्रकृती अचानक बिघडली आणि तिच्या तोंडातून व नाकातून रक्त येऊ लागले. ती वेदनेने प्रचंड तडफडू लागल्याचे पाहून कुटुंबातील इतर सदस्य हादरून गेले. त्यांनी तातडीने तिला भिवडी येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. परंतु, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी अलवरच्या बाल रुग्णालयात पाठवले. ॲसिड पोटात गेल्यामुळे बालिकेच्या अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाली असून, सध्या तिला व्हेंटिलेटरवर ठेवून डॉक्टर राशी कौशिक यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : भाजपला जमलं नाही, ते कॉकरोच जनता पार्टीने करुन दाखवलं! काय घडलं?

वडिलांना अश्रू अनावर

या हृदयद्रावक घटनेमुळे पीडित वडील मोहित पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. आपल्याला एकच मुलगी असून पत्नीनेच तिच्यासोबत असे कृत्य केल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, भिवडीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आहेत. मुलीवर उपचार सुरू असून, महिलेने आपल्याच पोटच्या गोळ्यावर असा जीवघेणा हल्ला का केला, या मागच्या मुख्य कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.
 

हे वाचलं का?