Crime News : बिहारच्या कैमुर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिथे चार मृतदेहांची मुंडकी आढळून आली होती. एकाच सुटकेस आणि पोत्यात ही मृतदेह सापडली होती. संबंधित मृतदेह हे सूनबाई, 2 नातवंडं आणि तरुणाचे होते. लहान मुलांच्या अंगणवाडीच्या गणवेशावरून पोलिसांनी या खूनाचा उलगडा करण्यात यश मिळवलं. या कुटुंबाची हत्या त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीने केली होती. मृत तरूण पतीचे नाव कृष्ण मुरारी असे होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुलीला विहिरीत फेकलं, दगडानं ठेचून मातीत पुरलं.. बापाचं हैवानी कृत्य
भावासह वहिनी आणि सख्ख्या दोन पुतण्यांना संपवलं
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, धाकट्या भावाने त्याचा मोठा भाऊ, वहिनी आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या करून शरीराचे तुकडे केले. नंतर हे तुकडे त्यांनी चारही मृतदेह सुटकेस आणि पोत्यात भरून दोन वेगवेगळ्या ठिकाणी भरून ठेवले आणि नंतर फेकून देण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत कुटुंब रामगड पोलीस ठाणे परिसरातील डहरक गावातील रहिवासी होते.
हत्येचं कारण आलं समोर
घडलेल्या घटनेनुसार, 5 मे रोजी कृष्णा मुरारीने आपल्या आईला मारहाण केली होती. त्याच्या आईने आपल्या मुलाला याबाबत माहिती दिली, विकास हा मित्र दीपक कुमार राजपूतसोबत घरी आला असता, 7 मे रोजी विकास आणि त्याचा मित्र दीपक खोलीत बसले होते, तेव्हा कृष्ण मुरारी तिथे आला आणि ते तिघे शेअर बाजारावर बोलू लागले होते.
याचदरम्यान, विकास आणि दीपकने चाकूने कृष्ण मुरारीवर हल्ला केला. विकासने आरडाओरड केली असता, त्याची पत्नी त्याला वाचवण्यास गेल्यानंतर आरोपींनी तिच्यावर देखील हल्ला केला. इतक्यातच दोन्ही मुलं घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांची देखील हत्या करण्यात आली.
चौघांची हत्या करून मृतदेह सुटकेसह पोत्यात भरले
चौघांचीही हत्या करत मटण तोडल्यासारखं तोडलं आणि मृतदेहाचे तुकडे एका सुटकेस आणि पोत्यात भरले. हे हैवानी कृत्य आईच्या समोर करण्यात आले होते. मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या भागात फेकण्यात आले होते. तसेच सुटकेसमध्ये भरलेले तुकडे हे रामगड येथील मोहनिया बॉरडर येथील दुर्गावती नदीत फेकण्यात आले. तसेच पुरावा आढळू नये यासाठी घरातील रक्त पुसले आणि सिमेंट पसरवण्यात आले.
या प्रकरणी कैमूरचे एसपी हरी मोहन शुक्ला यांनी सांगितलं की, मृतदेहाजवळ आढळून आलेले कपडे हे ममृताच्या शर्ट डरहक गावातील कृष्णा मुरारी याचे असल्याचे आढळून आले, त्याचे घर बंद होते. अशातच तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली आणि सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन डेटाची शास्त्रीय पद्धतीने तपासणी केली, त्यांच्या लक्षात आले की, ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मृताचा धाकटा भाऊ घरीच होता.
हे ही वाचा : चॅट पाहताच पारा चढला, बॉयफ्रेंडनं बीएच्या तरूणीला उसाच्या शेतात नेत..
पोलिसांनी विकास गुप्ताला ताब्यात घेत प्रकरणाची तपासणी केली. त्याने आपल्या मित्रांसह धाकट्या भावासह खूनाचा कबुलीनामा दिला. विकास हा आपल्या थोरल्या भावाच्या कृत्याला कंटाळून गेल्याने त्याने असं कृत्य केलं.
ADVERTISEMENT











