चॅट पाहताच पारा चढला, बॉयफ्रेंडनं बीएच्या तरूणीला उसाच्या शेतात नेत..

मुंबई तक

Crime News : पोलीस ठाण्याच्या परिसरातील किरोट गावानजीक उसाच्या शेतात तरूणीचा मृतदेह आढळला. या घटनेनं परिसर हादरून गेला होता, मृत तरूणीची शिनाख्त ललिता गौतम अशी ओळख समोर आली होती. पोलिसांनी काहीच तासांत या हत्येचा खुलासा करत आरोपीला ताब्यात घेतलं.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

दोघांचे बऱ्याच काळापासून सुरू होते प्रेमसंबंध 

point

दुसऱ्या पुरूषाशी चॅट करताना पाहिले असता अन् अंकुशचा पारा चढला

Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे रोहटा पोलीस ठाण्याच्या परिसरातील किरोट गावानजीक उसाच्या शेतात तरूणीचा मृतदेह आढळला. या घटनेनं परिसर हादरून गेला होता, मृत तरूणीची शिनाख्त ललिता गौतम अशी ओळख समोर आली होती. पोलिसांनी काहीच तासांत या हत्येचा खुलासा करत आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणातील आरोपीची अंकुश अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : Astrology : मे महिन्या अखेरीस 'लक्ष्मी नारायण राजयोग' निर्माण होणार, 'या' राशींचे भाग्य उजळणार

नेमकं काय घडलं? 

माहितीनुसार, ललिता गौतम ही 15 मे रोजी आपल्या घरी बीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. यानंतर ती अचानकपणे गायब झाली होती. बराच वेळ झालं तरीही ती घराकडे परतली नाही, चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. कोणतीच माहिती न मिळाल्याने टीपीनगर पोलीस ठाण्यात ललिता हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 

या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक एक्सपोर्टचं पथक दाखल झालं. मृतदेह ताब्यात घेत डॉक्टरांचे एक विशेष पथकाने त्या मृतदेहाची पाहणी केली आणि तपास केला. नंतर तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. मेरठ पोलीस वरिष्ठ अधीक्षक अविनाश पांडये यांनी या प्रकरणाचे गंभीर्य ओळखून घटनेच्या खुलाश्यासाठी तब्बल वेगवेगळ्या 5 पथकांचं गठन केलं. कुटुंबीयांच्या संशयावरून पोलिसांनी त्याच गावातील अंकुश नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले. 

दोघांचे बऱ्याच काळापासून सुरू होते प्रेमसंबंध 

एसएसपी अविनाश पांडे यांच्या माहितीनुसार, पोलीस फॉरेन्सिक आणि पाळत ठेवणाऱ्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अंकुशचा शोध घेण्यात आला होता. कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. दरम्यान अंकुश आणि ललिता यांच्यात बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते.

हे वाचलं का?