वैद्यकीय शिक्षण घेत असलेली तरुणी मित्रोसोबत हॉटेलमध्ये गेली, अन् दोन दिवसांनी मृतदेह आढळला

मुंबई तक

Crime News : हैद्राबादमधील एका हॉटेलच्या खोलीत 27 वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला. सृजनाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वैद्यकीय शिक्षण घेत असलेली तरुणी मित्रोसोबत हॉटेलमध्ये गेली

point

अन् दोन दिवसांनी मृतदेह आढळला

Crime News, हैदराबाद :  वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या  27 वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थिनीचा हैदराबादमधील एका हॉटेलच्या खोलीत मृतदेह आढळला. कोमाटी सृजना असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती हनमकोंडा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात बालरोगशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. सृजनाच्या कुटुंबीयांना तिच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनचे ठिकाण शोधले असता ते हैदराबादमधील मियापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले. पोलिसांनी हॉटेलमधील एका खोलीत पलंगावर सृजनाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : MPSC चं आंदोलन भाषणातून गाजवणारा तरुण Mumbai Tak वर, नेमकं काय म्हणाला?

मुलीची हत्या झाल्याची तक्रार, हॉटेलमध्ये तरुणी का गेली? 

पोलिसांच्या माहितीनुसार, सृजना 30 सप्टेंबर रोजी हैदराबादला आली होती. सोन्याची साखळी परत करण्याबाबत चर्चा करण्यासाठी तिच्या पुरुष मित्राने तिला बोलावल्याचे सांगण्यात आले. त्याच दिवशी ती आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये गेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 1 ऑक्टोबर रोजी संबंधित पुरुष हॉटेलमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. सृजनाचे वडील के. भूमय्या यांनी आपल्या मुलीची हत्या झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली.

हेही वाचा : एक कोटीच्या विम्यासाठी गरोदर पत्नीचा घात! आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवऱ्याचा भयानक डाव