पाऊस विसरा, आता उष्णतेची लाट, कुठल्या भागांना अलर्ट?

मुंबई तक

Maharashtra heat wave : महाराष्ट्रात मान्सूनच्या माघारीच्या काळात कोकणातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra heat wave
Maharashtra heat wave
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पाऊस विसरा, आता उष्णतेची लाट

point

कुठल्या भागांना अलर्ट?

Maharashtra heat wave : मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू असताना महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाची चर्चा सुरू आहे. मात्र, त्याचवेळी हवामानात बदल होऊन काही भागांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकणातील काही भागांसाठी उष्णतेसंदर्भात यलो अलर्ट दिला आहे. पुढील चार दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागांत कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत आकाश बऱ्यापैकी निरभ्र आहे. त्यामुळे ढगांचे आच्छादन कमी झाल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम जमिनीवर होत आहे आणि तापमानात वाढ होत आहे.

हेही वाचा : 'भाषा संपते तेव्हा संपूर्ण संस्कृती संपते, विचारही संपतो..', पाहा अभिजात मराठी भाषेच्या कार्यक्रमात फडणवीस काय-काय म्हणाले!

या भागांना उष्णतेसाठी यलो अलर्ट 

शनिवारच्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांना उष्णतेसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनच्या माघारीच्या काळात पावसाळा संपून पुन्हा उन्हाळा आणि त्यानंतर हिवाळ्याकडे जाण्याचा हा संक्रमणाचा काळ असतो. या काळात ढगांचे आच्छादन कमी झाल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीवर पोहोचतात. त्यामुळे तापमानात अचानक वाढ होऊ शकते. कोकण हा किनारपट्टीचा भाग असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवू शकतो. तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस असले तरी ते 35 ते 36 अंश सेल्सिअस असल्यासारखे जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या कोकणातील काही भागांत उष्णतेचा परिणाम अधिक जाणवू शकतो.

हेही वाचा : Asian Games: पाकिस्तानला पुन्हा धूळ चारली! टीम इंडियाने मिळवलं Gold, अभिषेक-तिलकची तुफानी खेळी!