MPSC चं आंदोलन भाषणातून गाजवणारा तरुण Mumbai Tak वर, नेमकं काय म्हणाला?

मुंबई तक

mpsc students protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून अध्यक्ष विवेक भीमणवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. आंदोलक विद्यार्थी विवेकानंद पाटील यांची भाषणं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

ADVERTISEMENT

mpsc students protest
mpsc students protest
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

MPSC चं आंदोलन भाषणातून गाजवणारा तरुण Mumbai Tak वर

point

MPSC अध्यक्ष विवेक भीमणवार यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. गांजवे चौकाजवळील लाल बहादूर शास्त्री रोड परिसरात एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनात कोल्हापूरचा विद्यार्थी विवेकानंद पाटील याची भाषणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी विवेकानंद सातत्याने भाषण करत असल्याचं त्याने सांगितलं. याच पार्श्वभूमीवर मुंबई Tak ने विवेकानंद पाटील यांच्याशी संवाद साधला. आंदोलनामागच्या मागण्या, परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

हेही वाचा : नेत्यांनाही बोलायला जमत नाही असं दोन-दोन तास बोलणाऱ्या विवेकानंद पाटीलचं भाषण

'परीक्षा पद्धतीबाबत वारंवार निर्णय बदलले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम'

विवेकानंद पाटील यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनाचा मुख्य उद्देश MPSC अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी हा आहे. यासोबतच 70 ते 80 हजार पदांची मेगा भरती करण्याची मागणीही विद्यार्थ्यांची आहे. सरकारकडून अध्यक्षांवर कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात असलं, तरी नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षांनी स्वतः राजीनामा द्यावा, अशी विद्यार्थ्यांची भूमिका असल्याचं विवेकानंद यांनी सांगितलं. त्यांच्या मते, परीक्षा पद्धत ऑब्जेक्टिव्ह असावी की डिस्क्रिप्टिव्ह, हा मुख्य मुद्दा नसून परीक्षा पारदर्शक आणि प्रामाणिक पद्धतीने होणं महत्त्वाचं आहे. परीक्षा पद्धतीबाबत वारंवार निर्णय बदलले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा : 'भाषा संपते तेव्हा संपूर्ण संस्कृती संपते, विचारही संपतो..', पाहा अभिजात मराठी भाषेच्या कार्यक्रमात फडणवीस काय-काय म्हणाले!