बस ड्रायव्हरनं नर्सरीच्या मुलीला चॉकलेट देत केलं लैंगिक शोषण, गुप्तांगावरील जखम पाहिली अन्..

मुंबई तक

• 09:00 AM • 05 Sep 2026

crime news : शाळेच्या बस ड्रायव्हरने तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. नंतर कुटुंबियांनी पीडितेच्या गुप्तांगावरील जखम पाहिली आणि हे प्रकरण समोर आले.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बस ड्रायव्हरने तीन वर्षाच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार

point

नराधमाला शाळेच्या परिसरातून केली अटक 

Crime News : दिल्लीच्या बवाना येथील प्रतिष्ठीत शाळेच्या परिसरात एका शाळेच्या बस ड्रायव्हरने तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. नंतर कुटुंबियांनी पीडितेच्या गुप्तांगावरील जखम पाहिली आणि हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत एफआरआय नोंदवत गुन्हा दाखल केला. आरोपीची विकास (वय 31) अशी ओळख समोर आली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

पीडितेच्या गुप्तांगाला जखम 

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही बवाना परिसरात आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. कुटुंबियांनी याच वर्षी परिसरातील शाळेत तिला प्रवेश दिला होता. मुलीच्या आईने सांगितलं की, 19 ऑगस्ट रोजी रात्री मुलगी कपडे बदलत होती. त्यावेळी तिला पाहिलं असता, तिच्या गुप्तांगाला जखम झाली होती. तेव्हा या घटनेची माहिती पीडितेच्या वडिलांना देण्यात आली होती. 

आरोपी नराधमाची शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार 

यानंतर आई वडिलांनी मुलीला विचारले असता, ती म्हणाली की, शाळेत एक अंकल आहेत त्यांनी असं गैरकृत्य केलं, ते सतत चॉकलेट देतात. मुलीच्या माहितीनुसार, आरोपीने तिच्यासोबत असं गैरकृत्य केले होते. नंतर कुटुंबियांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार दाखल केली होती.    

नराधमाला शाळेच्या परिसरातून केली अटक 

शाळेच्या प्राध्यापकाने 24 ऑगस्ट रोजी पीडितेच्या पालकांना शाळेत बोलावले. मुलीने फोटो पाहून आरोपीची ओळख पटवली. शाळेच्या प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काही फुटेज दाखवले असता, चिमुरडीने आरोपीची ओळख पटवली. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी बस ड्रायव्हरला शाळेच्या परिसरातून अटक केली. आरोपी आठ महिन्यांपासून शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करत होता. 

शाळेच्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिल्यानंतर आरोपी विकासबाबत प्रकरणाचा खुलासा झाला. विकास हा खिशात चॉकलेट घेऊन इकडून तिकडे फिरत होता. त्याने पीडितेचा पाठलाग केला असता, पीडितेला त्याने चॉकलेट दिले. त्याने पीडितेला चॉकलेट दिलं आणि पायऱ्यांखाली तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.