विम्याच्या पैशांसाठी भावानेच भावावर दगडाने हल्ला करत संपवलं, नंतर दुचाकीवरून दिलं फेकून पुढे...

मुंबई तक

• 01:56 PM • 01 Apr 2026

Crime News : विम्याच्या पैशांच्या लोभापोटी एका व्यक्तीने आपल्याच भावाची हत्या केली आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली असता, त्यांनी संबंधित घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न केला.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

विम्याचे पैसे मिळवण्यासाठी भावाच्या हत्येचा कट

point

दारू पाजून काटा काढला

Crime News : विम्याच्या पैशांच्या लोभापोटी एका व्यक्तीने आपल्याच भावाची हत्या केली आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली असता, त्यांनी संबंधित घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही घटना 7 मार्च रोजी घडली असून मृत व्यक्तीचे नाव देवी सिंग रावत असे आहे. पोलिसांच्या पथकामुळे हे सत्य समोर आले. ही घटना राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : काही राशीतील लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहिल, तर 'या' लोकांना सरप्राइज मिळण्याची शक्यता

विम्याचे पैसे मिळवण्यासाठी भावाच्या हत्येचा कट

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, तपासातून उघडकीस आले की, मृताचा भाऊ, दूध सिंगने विम्याचे पैसे मिळवण्यासाठी या हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी रक्कम जाहीर केली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, दूध सिंगने आपला भाऊ, देवी सिंगसाठी विमा पॉलिसी काढली आणि नंतर, होळीच्या बहाण्याने, कथितरित्या तो विमा काढण्यास भाग पाडले होते. 

दारू पाजून काटा काढला

4 मार्च रोजी, त्याने आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या भावाची हत्या करण्याचा कट रचला होता. 6 मार्च रोजी, आरोपीने देवी सिंगला दारू पाजली आणि त्याचा मोबाईल फोन बंद ठेवला. त्याला एका ठिकाणी निर्जनस्थळी नेले आणि त्याच्यावर दगडफेक करून त्याला जथमी केले. हा अपघात वाटावा यासाठी त्याला निर्जनस्थळी नेले आणि एका धावत्या दुचाकीवरून ढकलून दिले. यानंतर आरोपी दूध सिंगने पोलीस ठाणे गाठून अपघाताची खोटी तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : अरे बापरे.. पुणेकरांनो, तुमच्या पुण्याचं अचानक कसं झालं काश्मीर? सगळा झांगडगुत्ताच!

तर दुसरीकडे ग्रामस्थ मंडळींना हा अपघात असल्याचा त्यांना विश्वास बसत नव्हता. त्यांनी हा खून असल्याचं म्हटलं आणि तपासाची मागणी केली. नंतर पोलिसांनी तपास केला असता, हा अपघात नसून खून असल्याची माहिती समोर आली. तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी केलेल्या एकूण तपासातून हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी दूध सिंग उर्फ ​​दिनेश सिंग, भगवान सिंग, सुरेंद्र सिंग आणि टिकम सिंग यांना अटक केली आहे.