ऐन दिवाळीत वृद्ध महिलेच्या गळ्यावर दिवसाढवळ्या चाकूने वार, घटनास्थळी रक्ताचे वाहिले पाट, पोलिसंही चक्रावले

crime news : ऐन दिवाळी सणात आनंदाच्या वातावरणात एक दु:खद घटना समोर आली आहे. एका व्यवसायिक  वृद्ध महिलेची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 01:09 PM • 22 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

वृद्ध महिलेची दिवसाढवळ्या हत्या

point

एकूण प्रकरण काय? 

Crime News : ऐन दिवाळी सणात आनंदाच्या वातावरणात एक दु:खद घटना समोर आली आहे. एका व्यवसायिक वृद्ध महिलेची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली आहे. संबंधित वृद्ध महिलेचे काही मुलांसोबत वादंग निर्माण झाला होता. त्याच वादाचे रुपांतर हे खूनात झाले. काही मुलांनी मिळून वृद्ध महिलेचा गळा चिरून तिची हत्या केली. या प्रकरणात आता पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली असता, या घटनेनं परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम पण आपलेच..', मनसे सरकारवर एवढी का संतापली?

एकूण प्रकरण काय? 

संबंधित घटना ही दुपारी 2.30 वाजता घडली. नवाबुद्दीन यांच्या 70 वर्षीय पत्नी फिरदौस आणि शेजारी इम्रान यांच्या कुटुंबात जुन्या वादावरून तोंड फुटले. त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरु होती. रविवारी दोन्ही कुटुंबातील मुलांमध्ये पुन्हा वादंग निर्माण झाला, तसेच हाणामारीही झाली. सोमवारी फिरदौसची मुलं बाजारात गेली होती.  तेव्हा वृद्ध महिला घरी एकटीच आपल्या दारात बसली होती. तेव्हा इम्रानने त्या वृद्ध महिलेवर हल्ला केला असता, त्यानंतर तिने तिला पकडून तिचा गळा चिरला आणि तिच्या मानेचा अर्धा भाग खाली लटकलेला दिसून आला. रक्ताचे पाट वाहू लागले होते. हे पाहून परिसरातील लोक अधिकच घाबरून गेले. रस्त्यावर खेळणारी मुलं घटनास्थळावरून पळून गेली. 

आरोपींनी डोकं लावून हत्येचा कट रचला होता. घटनेच्या काही वेळानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणाची माहिती एसीपी हरिपर्वत अक्षय महाडीक हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी घटनास्थळी दाखल करण्यात आला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : ऐन दिवाळी सणाला पावसाचं सावट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

इम्रानच्या मुलाला फिरदौज गटातील काही मुलांनी कानशीलात लगावली त्यातूनच हा वाद निर्माण झाला. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी इम्रान महिलेला धमकावण्यासाठी गेला. त्याच्या धमक्यांमुळे महिला किंचितशीही भयभीत झाली नाही. त्यांच्यात शिवीगाळ झाली, त्यानंतर इम्रानने महिलेच्या मानेवर चाकूने वार केले. याच प्रकरणात आता संबंधित तरुणाचा पोलिसांनी शोध घेत ताब्यात घेतलं आहे. 

    follow whatsapp