अविवाहित असताना आई झाल्याने बापानेच केली मुलीची हत्या; प्रियकराने नवजात बाळाला पुलाखाली फेकले

Crime News : ही घटना मधेपुरा जिल्ह्यातील उदाकिशुनगंज परिसरात घडली. 13 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पीडित तरुणीला प्रसूती कळा येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर रक्तस्त्राव अधिक झाल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. हीच संधी साधून मुलीच्या पित्याने आणि चुलत्याने तिला रुग्णवाहिकेऐवजी स्वतःच्या खाजगी गाडीतून नेण्याचे ठरवले. परंतु, तिला दवाखान्यात नेण्याऐवजी ते घरी घेऊन गेले आणि तिथेच लोक-लाजेस्तव तिचा गळा दाबून खून केला.

Crime News

Crime News

मुंबई तक

23 Feb 2026 (अपडेटेड: 23 Feb 2026, 12:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अविवाहित असताना आई झाल्याने बापानेच केली मुलीची हत्या

point

प्रियकराने नवजात बाळाला पुलाखाली फेकले

Crime News : मधेपुरा (बिहार) : बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 'इज्जती'च्या खोट्या कल्पनेतून एका पित्याने आणि चुलत्याने आपल्या 20 वर्षीय पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, ज्या प्रियकरामुळे ती तरुण मुलगी गरोदर राहिली, त्यानेही माणुसकी सोडून आपल्या अवघ्या काही तासांच्या नवजात बाळाला पिशवीत भरून पुलाखाली फेकून दिले. पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा पिता, चुलता आणि प्रियकर अशा तिघांनाही अटक केली आहे.

हे वाचलं का?

हॉस्पिटलमधूनच रचला हत्येचा कट

ही घटना मधेपुरा जिल्ह्यातील उदाकिशुनगंज परिसरात घडली. 13 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पीडित तरुणीला प्रसूती कळा येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर रक्तस्त्राव अधिक झाल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. हीच संधी साधून मुलीच्या पित्याने आणि चुलत्याने तिला रुग्णवाहिकेऐवजी स्वतःच्या खाजगी गाडीतून नेण्याचे ठरवले. परंतु, तिला दवाखान्यात नेण्याऐवजी ते घरी घेऊन गेले आणि तिथेच लोक-लाजेस्तव तिचा गळा दाबून खून केला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आणि पोलिसांची दिशाभूल

हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी पिता आणि चुलता तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी भागलपूर येथील गंगा घाटावर घेऊन जात होते. मात्र, संशयास्पद हालचालींमुळे स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि नवगछियाजवळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. स्वतःला वाचवण्यासाठी पित्याने पोलिसांकडे असा बनाव केला की, आपली मुलगी गरोदर असल्याचे आपल्याला माहितच नव्हते आणि तिच्या प्रियकरानेच तिचे लैंगिक शोषण करून तिला धोका दिला.

प्रियकराच्या कबुलीने सत्य बाहेर

उदाकिशुनगंजचे एसडीपीओ अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी 20 फेब्रुवारी रोजी प्रियकर रिशु राज उर्फ हेमराज याला ताब्यात घेतले असता त्याने धक्कादायक खुलासा केला. "मुलीच्या कुटुंबीयांनीच तिची हत्या केली आहे," असे त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर, त्याने स्वतः त्या नवजात बालिकेला एका लाल-पिवळ्या पिशवीत भरून एनएच-106 वरील पुलाखाली फेकून दिल्याची कबुली दिली. प्रियकराने दाखवलेल्या जागेवरून पोलिसांनी त्या चिमुकलीचा मृतदेह जप्त केला आहे.

तिन्ही आरोपी गजाआड

पोलिसांनी कडक चौकशी केल्यानंतर मुलीचा बाप आणि चुलता यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली गाडी आणि मोबाईल जप्त केले असून, या तिन्ही नराधमांना तुरुंगात धाडले आहे. एका बाजूला बापाने मुलीचा जीव घेतला, तर दुसऱ्या बाजूला जन्मदात्या पित्यानेच आपल्या लेकराला कचऱ्यासारखे फेकून दिले, या घटनेने बिहारसह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दिली माहिती
 

    follow whatsapp