Crime News : बॉलिवूडची अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाचा खून करण्यात आला होता. हुमाचा भाऊ जिथं राहत होता, तिथल्याच रहिवाशांनी हुमाच्या भावाची सूरा भोकसून हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आसिफ अले आहे. ही घटना गुरुवारी रात्री 11 वाजता घडली होती. या खूनाचे कारण आता समोर आलं आहे. पार्किंगच्या शुल्लक वादावरून ही हत्या करण्यात आल्याचं तपासातून समोर आलं. दरम्यान, आरोपीचे नाव उज्ज्व आणि दुसऱ्याचे नाव गौतम असल्याचे सांगण्यात येते.
ADVERTISEMENT
खूनाचं ठोस कारण आलं समोर
जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा आसिफ म्हणाला की, मला कृपया घरी जाण्यासाठी रस्ता द्या. त्यानंतर आरोपी उज्ज्वल हा आसिफशी वाद घालू लागला. नंतर त्याने आसिफला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर दोघांच्यात हाणामारी सुरू झाली. आसिफ उज्ज्वलशी भांडत असतानाच गौतम मध्येच आला आणि धारदार शस्त्राने भोसकले. एकूण घडलेले सर्व प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.
यानंतर आसिफ खाली पडला आणि काही वेळानं आसिफला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित कले. पोलिसांनी संबंधित प्रकरणाची माहिती मिळाली असता, त्यांनी दोन्ही भावांना अटक केली आहे, तपासातून समोर आलं की, दोन्ही भावांनी आसिफशी यापूर्वीही अनेकदा वाद झाला होता.
त्या शस्त्राने केला हल्ला
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, अगदी गँग ऑफ वासेपूरमध्ये वापरण्यात आलेल्या शस्त्रानेच हल्ला करत आसिफला संपवण्यात आले. आसिफबाबत अनेक गुपितं उघड होताना दिसतात. तो मांस पुरवण्याचेही काम करायचा, तो रेस्टॉरंटना मांस पुरवण्याचे काम करायचा. त्याचा भाऊ अल-कुरेशी नावाचे रेस्टॉरंट चालवतो आणि तो त्याच्या कुटुंबात राहतो. आसिफला दोन बायका होत्या. पहिली पत्नी आणि दोन मुले ही त्याच्यासोबतच राहायची. दोन वर्षांपूर्वी आसिफ आपल्या पत्नीसोबत वेगळे राहू लागला.
ADVERTISEMENT
