नात्याला काळीमा! रक्षाबंधन दिवशीच भावाने केला बहिणीचा खून, कारण ऐकून हादरून जाल

crime news : रक्षाबंधन या सणाला देशात विशेष महत्त्व आहे. पण, याच सणादिवशी एका तरुणाने आपल्या बहिणीची हत्या करत काळिज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली.

crime news

crime news

मुंबई तक

• 10:49 AM • 11 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रक्षाबंधन दिवशी घटना अनर्थ

point

भावानेच केला बहिणीचा खून

point

धक्कादायक कारण आलं समोर

crime news : रक्षाबंधन या सणाला देशात विशेष महत्त्व आहे. पण, याच सणादिवशी एका तरुणाने आपल्या बहिणीची हत्या करत काळिज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव कुमारी सहोदर उर्फ पुट्टी असे आहे. रविवारी पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास करत एकूण घटनेचा घटनाक्रम सांगितला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Mumbai Rain: अरबी समुद्र खवळणार! दादर, अंधेरी, कुर्ला आणि सायनमध्ये पाणी साचणार? मुसळधार पावसाचा अंदाज

रविवारी पोलिसांनी सांगितले की, कुमारी सहोदर उर्फ पुट्टीचा मृतदेह रविवारी चंद्रपुरा गावातील एका निर्जनस्थळी आढळला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुट्टीचा भाऊ अरविंद आणि त्याचा मित्र प्रकाश प्रजापती दोघांचेही वय 25 वर्षे होते. संबंधित प्रकरणात त्यांनी केलेल्या खूनाच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले. पोलीस तपासातून असे समोर आले की, पुट्टीचे विशाल नावाच्या 19 वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध होते. याचाच राग मनात ठेऊन अरविंदने संशयास्पद हत्या केल्याचं बोललं जातंय.

नेमकं काय घडलं? 

पीटीआयने दिलेल्या एका वृत्तानुसार, विशालचा मृतदेह हा गुढा गावानजीक असलेल्या एका निर्जनस्थळी आढळून आला होता. पुट्टीचा भाऊ अरविंद आणि त्याचा मित्र प्रकाश प्रजापती यांना हत्येच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. चार महिन्यांपूर्वी पु्ट्टी आणि विशाल घरातून पळून गेले होते, परंतु नातेवाईक आणि गावातील वृद्धांनी मध्यस्थी करूनही दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला, तरीही दोघे एकमेकांना चोरून भेटायचे, या सर्व प्रकारामुळे अरविंद खूपच संतापला.

काही दिवसांपूर्वी पुण्याहून गावी परतलेल्या अरविंदला हे प्रेमप्रकरण डोक्यात जाऊ लागले होते, हा सर्व प्रकार पाहून अरविंदची सटकली. त्यानंतर अरविंदने प्रजापतीला हाताशी घेऊन बहीण पुट्टीचा खून केला आणि तिची हत्या केली.

हे ही वाचा : कुत्र्यावर बलात्कार करणारा वासनांध सापडला, Video व्हायरल झाला अन् तुफान राडा

रविवारी चंद्रपुरा गावातील दादा महाराजांच्या प्लॅटफॉर्मजवळ त्यांचा मृतदेह आढळला. त्या मृतदेहाचं मुंडण करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. या संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

    follow whatsapp