कुत्र्यावर बलात्कार करणारा वासनांध सापडला, Video व्हायरल झाला अन् तुफान राडा

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका तरुणाने भटक्या कुत्र्याशी अश्लील वर्तन केल्याचं समोर आलं आहे. त्याचं हे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं.

कुत्राच ठरला वासनेचा बळी! अश्लील चाळे अन्...
कुत्राच ठरला वासनेचा बळी! अश्लील चाळे अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुत्र्यासोबत तरुणाचे अश्लील चाळे

point

कुत्र्यासोबत केलं घाणेरडं कृत्य अन् व्हिडीओ व्हायरल

Dog Rape Case: काही लोक आपली वासना मिटवण्यासाठी निष्पाप प्राण्यांनाही सोडत नसल्याच्या बऱ्याच घटना पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशातील लखनऊमधून असाच एक धक्कदायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने भटक्या कुत्र्याशी अश्लील वर्तन केल्याचं समोर आलं आहे. त्याचं हे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. 

कुत्र्यावरच केला बलात्कार 

संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोक अतिशय संतापले आणि त्यांनी तरुणाला अटक करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. आसरा द हेल्पिंग हँड्स नावाच्या एका एनजीओने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. 

ही घटना गोमती नगरमधील पत्रकारपुरम येथील आहे. एका तरुणाने कुत्र्याला अन्नाचे आमिष दाखवून त्याच्या जवळ बोलावले. कुत्रा त्या तरुणाजवळ पोहोचताच त्या तरुणाने त्याच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी रेकॉर्ड केला.

हे ही वाचा: बहिणीच्या अश्रूंचा बांध फुटला! रक्षाबंधनाच्या दिवशी मृतदेहाला बांधली राखी.. बिबट्यानं होत्याचं नव्हतं केलं

व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतंय?

ही घटना दोन दिवसांपूर्वीची असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी तरुण कुत्र्यासोबत घृणास्पद कृत्य करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. लोकांनी तरुणाला कुत्र्यासोबत अश्लील वर्तन केल्याचं पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांकडून विरोध दर्शवला जात आहे. 

हे ही वाचा: एकाच नवऱ्याच्या दोन बायका! पतीला दिलं नशेचं औषध अन् प्रायव्हेट पार्टच... संतापलेल्या पत्नीने केलं असं काही...

व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याने सगळं सांगितलं 

पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता घटना 7 ऑगस्ट रोजी घडल्याचं समोर आलं आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या माणसाने चौकशीत सांगितलं की, आरोपी व्यक्ती बराच वेळ कुत्र्यांजवळ फेऱ्या मारत होती. काही वेळाने, त्या आरोपीने एका कुत्र्याला अन्नाचं आमिष दाखवलं आणि त्याला त्याच्या जवळ बोलावलं. त्यानंतर त्याने कुत्र्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी हे घृणास्पद कृत्य पाहिल्यानंतर त्याचा विरोध केला असता संबंधित तरुण रस्त्यावरील कुत्र्याला सोडून तिथून पळून गेला.

हे वाचलं का?

    follow whatsapp