मित्राच्या बहिणीसोबत होतं अफेअर..भावाची सटकली! रक्षाबंधनाआधीच मित्राचा केला गेम, घडलं सर्वात भंयकर..

Today Shocking Murder Case : राजधानी दिल्लीत नंद नगरी परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. 28 वर्षांच्या कपिलची गोळी मारून हत्या करण्यात आली.

Today Shocking Viral News

Today Shocking Viral News

मुंबई तक

• 03:15 PM • 10 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रक्षाबंधनाआधी घडली सर्वात धक्कादायक घटना

point

भावाने बहीणीच्या प्रियकराला गोळ्या घालून संपवलं

point

त्या गावात नेमकं काय घडलं?

Today Shocking Murder Case : राजधानी दिल्लीत नंद नगरी परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. 28 वर्षांच्या कपिलची गोळी मारून हत्या करण्यात आली. शिवम (26) असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शिवम आणि मृत कपिल यांच्या जवळीक वाढली होती, त्यामुळे शिवमचं टेन्शन वाढलं होतं. याच कारणामुळे त्याने कपिलच्या हत्येचा कट रचला आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात आरोपीने खुलासा केला की, शिवमची बहीण आणि मृत कपिल यांच्यात मैत्री वाढली होती. ज्यामुळे शिवमला खूपच टेन्शन आलं होतं. याच कारणामुळे शिवमने कपिलवर गोळीबार करून त्याची हत्या केली. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तुल ताब्यात घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही मॅकेनिक होते आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे आणि याप्रकरणाशी संबंधीत सर्व गोष्टींची चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा >> "तुला स्वयंपाक येत नाही चल घरून 20 लाख घेऊन ये..." पुण्यात हुंड्यासाठी छळ अन् अखेर पीडितेनं...

7 जणांनी तरुणाला केली बेदम मारहाण

यापूर्वी उत्तर-पूर्वी दिल्लीच्या नंद नगरी परिसरातही धक्कादायक घटना घडली होती. काही लोकांनी 21 वर्षीय तरुणाला मारहाण केली होती. पोलिसांनी म्हटलं होतं की, या प्रकरणी सात जणांना अटक केली. विशाल उर्फ काकू (22), अंकित (22), हिमांशू (25), किशन उर्फ राहूल उर्फ चार्ली (30), चेतन उर्फ लक्की (22), गौरव उर्फ पिल्लू (22) आणि सुमित उर्फ सिंचू (22), या आरोपींना अटक केली आहे. 

पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, ही घटना 4-5 ऑगस्ट दरम्यान, रात्री घडली होती. नंद नगरी पोलीस ठाण्यात एक पीसीआर कॉल आला होता. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, वाल्मिकी मार्गावर काही लोक एका व्यक्तीला मारहाण करत होते. त्यांनी सांगितलं की, पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधी गंभीर जखमी झालेल्या आशीषला त्याच्या कुटुंबियांनी जीटीबी रुग्णालयात दाखल केलं होतं. शुक्रवारी उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी म्हटलं की, तपासादरम्यान, या घटनेसंबंधीत पुरावे शोधले आणि सात लोकांना अटक केली. 

हे ही वाचा >> Govt Job: आता सरकारी बँकेत नोकरी मिळणं सोप्पं... 'या' बँकांमध्ये तब्बल 17000 हून अधिक पदांसाठी भरती!

    follow whatsapp