"तुला स्वयंपाक येत नाही, जा तुझ्या घरून..." पुण्यात नव्या नवरीसोबत जे घडलं ते ऐकून तुम्हीही...

मुंबई तक

pune crime : पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. अशातच आता पुण्यातच सासरच्यांकडून छळाला कंटाळून आणखी एका विवाहित तरुणीने आत्महत्या केली आहे.

ADVERTISEMENT

pune crime
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती

point

हुंड्याच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल

pune crime : पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना आता अशीच आणखी एक धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. सासरच्यांकडून छळाला कंटाळून आणखी एका विवाहित तरुणीने आत्महत्या केली आहे. स्नेहा विशाल झेंडेगे असे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. हुंड्याच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

हे ही वाचा : "तुला घरातील काम व्यवस्थित येत नाही, तुला शेतातलं काम..." लग्नाच्या चार महिन्यानंतर सासरच्यांचा छळ अन् सूनेनं उचललं टोकाचं पाऊल

नेमकं काय घडलं? 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आत्महत्या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला. सासरच्या लोकांविरोधात स्नेहाच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केलेत. कैलास मच्छिंद्र सावंत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणी सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहाचे गेल्या वर्षी विशाल झंडगे नावाच्या व्यक्तीसोबत विवाह झाला होता. हे दोघेही पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील रहिवासी होते. लग्नानंतर स्नेहा आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये अनेकदा वाद व्हायचे. सासरच्यांनी पीडितेला अनेकदा छळल्याचा आरोप तिच्या माहेरील नातेवाईकांनी केला होता. 

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, स्नेहाला निटसा स्वयंपाक नीट करता येत नाही, तिने माहेरून वीस लाख रुपये घेऊन यावेत, तसेच सासरच्या मंडळींनी त्या पीडितेचं शारीरिक आणि मानसिक शोषण केलं. सासरच्या अशा वागण्याने तिला आत्महत्येस प्रवृत्तही केल्याचं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp