परभणी: लग्नाच्या 4 महिन्यानंतर सुनेने संपवलं आयुष्य, 'ते' शब्द लागले जिव्हारी अन्...

मुंबई तक

maharashtra crime : आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही आजही सासरी महिलांचा मोठ्या प्रमाणत छळ दिसून येतो. महिलेला सतत टोमणे दिल्याने सूनेनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

ADVERTISEMENT

maharashtra crime
maharashtra crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सासरी महिलांचा मोठ्या प्रमाणत छळ

point

विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

point

परभणी तालुक्यात नेमकं काय घडलं?

maharashtra crime: आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही आजही सासरी महिलांचा मोठ्या प्रमाणत छळ दिसून येतो. सासरच्या मंडळींनी सूनेला टोमणे देत, छळ करून मारलं आहे. "तुला घरातील काम व्यवस्थित येत नाही, तु शेतातलं काम करत नाहीस", असं म्हणत सासरच्यांकडून विवाहितेला शिवीगाळ केली. लग्नाला केवळ चार महिने झालेल्या नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून घरातील उंदीर मारण्याचं औषध प्यायलं आणि आपलं आयुष्य संपवलं. ही घटना परभणीतील जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे घडली.

हे ही वाचा : शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्याने लक्ष्मी-नारायण राजयोगाची निर्मिती, काही राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार

नेमकं काय घडलं? 

त्यानंतर नवविहितेला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचादारम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृत नवविवाहितेचे नाव तन्वी शुभम भाबळे (वय 18) असे आहे. तन्वीचा विवाह हा शुभम भांबळे नावाच्या तरुणासोबत झाला होता. त्यानंतर दोघांचा चांगला संसार सुरु होता, त्यानंतर सासरच्या मंडळींना सूनेला म्हणजेच तन्वीला सासरवास दाखवायला सुरुवात केली. तिला कामावरून टोमणे देण्यास सुरुवात केली. तुला घरातील काम करता येत नाही. शेतात कामाला जात नाही, असे म्हणत तन्वीला अनेकदा शिवीगाळही केली.

दरम्यान, तन्वीने आपल्या माहेरच्यांना सुरू असलेल्या सततच्या टोमण्यांबाबत, छळांविषयी माहिती दिली. तरीही तन्वीचा छळ सुरुच होता. नवऱ्यासोबत सासू सासरे देखील तन्वीचा छळ करत असल्याने तन्वी प्रचंड खचून गेली. 3 ऑगस्ट रोजी तन्वीने सासरच्या जाचाला कंटाळून उंदीर मारण्याचं औषध प्यायला दिलं आणि टोकाचं पाऊल उचललं.

संबंधित घटनेची माहिती तरुणीच्या घरी कळताच तन्वीला परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तन्वीला छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी नेण्यास सांगितले. मात्र, उपचारादरम्यान, तन्वीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp