Murder Case: कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यातील कोरतगेरे येथील कोलाला गावात एका महिलेचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करुन ते प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. घटनेची तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT
महिलेच्या मृतदेहाचे तुकडे
मिळालेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट रोजी रस्त्याच्या कडेला पडलेल्या सात प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळले. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, कोरतगेरे पोलिसांनी परिसरात तपास सुरू केला आणि 8 ऑगस्ट रोजी आणखी सात पिशव्या जप्त केल्या, ज्यामध्ये उर्वरित मृतदेहाचे तुकडे आणि महिलेचे डोकं आढळलं. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डोक्याच्या भागाच्या आधारे महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
हे ही वाचा: ड्रग्स प्रकरणातील आरोपीकडून भाजप मंत्र्यांचं स्वागत, बावनकुळे म्हणतात.. 'वाजवा टाळ्या' त्या Video ची A टू Z स्टोरी
तपासासाठी विशेष पथक
तुमकुरुच्या पोलीस अधिक्षकांनी घटनेचा तपास करण्यासाठी शुक्रवारी एक विशेष पथक तयार केले आणि त्यांना कोलाला गाव आणि आसपासच्या परिसरात शोध सुरू करण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीने मृतदेहाचे तुकडे गाडीतून फेकले असावेत. तसेच, चिम्पुगनहल्ली आणि वेंकटपुरा गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर विविध ठिकाणी पिशव्या विखुरलेल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा: Personal Finance: भारतात 'या' स्किममध्ये तुमचे पैसे आहेत 100 टक्के सुरक्षित, डोळे झाकून ठेवा विश्वास!
पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांच्या मते, महिलेची दुसऱ्या ठिकाणी हत्या करण्यात आली असून नंतर मृतदेहाचे तुकडे करून येथील परिसरात फेकण्यात आले. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मृतदेहाच्या उर्वरित भागांचा शोध घेण्यात अडचणी आल्या. या प्रकरणाचा तपास सुरू आहे असून पोलीस मारेकऱ्यांची ओळख पटवण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगण्यात येत आहे. महिलेच्या हत्येमागचं कारण आणि प्रकरणातील आरोपींविषयी अद्याप माहिती मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
