Crime News : एका तरुणाने सोशल मीडियाद्वारे सीआरपीएफ जवानाच्या पत्नीशी मैत्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने तिचे न्यूड व्हिडिओ शूट केले आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपी इथवरच न थांबता त्याने 8-10 लाख रुपये हडप केले. आरोपीने तरुण अजूनही महिलेला धमकी देत आहे. संबंधित प्रकरणात पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशातील झांसी येथे घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाचा शुल्लक कारणावरून खून, कामावरून परतत असतानाच... नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरण हे झाशीच्या प्रेमनगर पोलीस ठाणे परिसरात घडले आहे. पीडित महिला ही तिच्या मुलांसह राहते. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी तिची सोशल मीडियाद्वारे विकास नावाच्या एका व्यक्तीशी मैत्री झाली. ही मैत्री हळूहळू प्रेमात रुपांतरीत झाले. त्यानंतर दोघेही व्हिडिओ कॉल करू लागले होते. व्हिडिओ कॉल करून बोलू लागले. व्हिडिओ कॉलदरम्यान आरोपी विकासने तिचा न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यात आले. ब्लॅकमेल केल्यानंतर 25 हजारांची मागणी करण्यात आल्याचा आरोप पीडितेनं केला आहे.
महिलेनं अब्रुपोटी दागिने विकले
बदनामीच्या भीतीने महिलेनं त्याला पैसे दिले. त्यानंतर तो तिला दररोज त्रास देऊ लागला. तिचा नवरा घराबाहेर काम करतो, म्हणून महिलेनं त्याला काहीही सांगितलं नाही. आरोपी विकासचे कारस्थान इथवरच न थांबता तो आणखी पैशांची मागणी करू लागला. त्यानंतर पीडित महिलेनं समाजाच्या भीतीने ती महिला त्याला पैसे देत राहिली. यासाठी तिने तिचे दागिने विकले, तिने तिचे घरही गहाण ठेवण्यात आले.
हे ही वाचा : भटक्या कुत्र्याच्या तोंडात माणसाच्या हाताचा तुकडा, व्यक्तीनं पाहिलं अन् फुटला घाम, एका झटक्यातच...
आतापर्यंत विकासने महिलेकडून सुमारे 8-10 लाख रुपये घेतले आहेत. त्यानंतरही त्याने पैशांची मागणी केली आहे. महिलेच्या म्हणण्यांनुसार, या सर्व गोष्टींमुळे नाराज होऊन तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार केला, पण तिनं टोकाचं पाऊल उचललं नाही. अखेर तिने धाडस दाखवलं, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विकासविरुद्ध कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरु केली आहे.
ADVERTISEMENT
