Delhi Crime : दिल्लीतील नमाजुद्दीन परिसरात स्कूटी पार्किंगच्या वादातून बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली आहे. आसिफ कुरेशी (वय 42) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितलं की, ही घटना गुरूवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास जंगलपुरा येथील भोगले लेनमध्ये घडली आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : प्लास्टिक स्टूल, लाठी, पीव्हीसी पाईपने पतीकडून सोन्यासारख्या पत्नीचा खून, पुण्यातील चाकणमध्ये काय घडलं?
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, गुरूवारी रात्री उशिरा आसिफा कुरेशीचा पार्किंगवरून काही तरुणांसोबत वाद उफळला. त्यानंतर आरोपींनी आसिफवर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर आसिफला गंभीर अवस्थेत जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, पीडित आसिफचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. आरोपीने काही किरकोळ कारणावरून त्याच्यावर क्रूरपणे हल्ला केल्याची माहिती तपासातून समोर आली.
आरोपींची ओळख आली समोर
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एफआरआय नोंदवला आहे आणि दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपी हे सख्खे भाऊ असून एकाचं उज्ज्वल (वय 19) आणि गौतम (वय 18) अशी नावे आहेत. ते दोघेही आसिफ कुरेशीच्या घराजवळच राहतात. भांडणावेळी एका आरोपीने छातीवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा : ऑगस्ट महिन्यात लक्ष्मी नारायण योग, काही राशीतील लोकांचं नशीब फळफळेल, तुमच्या राशीचं भविष्य घ्या जाणून
आसिफची पत्नी सैनाज कुरेशी यांनी पोलिसांना सांगितलं की, आसिफ कामावरून घरी परतत होते, तेव्हा घराच्या गेटसमोरच शेजाऱ्यांची स्कूटी उभी होती. ती स्कूटी काढूण टाकण्यास सांगितली. याच वादावरून शिवीगाळही करत धारदार शस्त्राने हल्ला केला.
ADVERTISEMENT
