Suicide Case: अकोला जिल्ह्यातील पारस गावात एका तरुणाने प्रेम विवाह केल्यामुळे त्याच्या सासरच्या लोकांनी त्याला मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक भावनिक व्हिडिओ बनवला आणि तो त्याच्या भावाला पाठवला. या व्हिडीओमध्ये पीडित तरुणाने त्याच्या वेदना आणि समस्या सांगितल्या. तसेच, तरुणाने न्यायाची याचना केली.
ADVERTISEMENT
ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या
सोमवारी (4 ऑगस्ट) सकाळी संघपाल सिद्धार्थ खंडारे (30) नावाच्या तरुणाने पारस रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळावर तपासणी केली असता पोलिसांना एक तुटलेला मोबाईल फोन आणि एक चावीही सापडली. मृतदेहाची ओळख संघपाल खंडारे अशी पटवण्यात आली असून त्याच्या कुटुंबियांनी याबाबत पुष्टी केली.
पीडित तरुणाने व्हिडीओमध्ये काय सांगितलं?
आत्महत्या करण्यापूर्वी संघपालने त्याच्या भावाला एक भावनिक व्हिडिओ पाठवला होता. ज्यामध्ये तो म्हणाला, "दादा, मी काय म्हणतोय ते काळजीपूर्वक ऐक. माझे माझ्या पत्नीशी भांडण झालं आणि त्यानंतर तिचा भाऊ, चुलत भाऊ आणि इतर चार-पाच लोकांनी मला बेदम मारहाण केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी मला 3 लाख रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडले आणि आता ते मला जगूही देत नाहीयेत. हा व्हिडिओ पोलिसांना दाखव आणि त्या सर्वांवर गुन्हा दाखल कर." त्याला त्याच्या सासरच्या लोकांकडून जीवाला धोका आहे आणि त्याच्या मृत्यूसाठी सासरच्या मंडळींनाच जबाबदार धरले पाहिजे, असंही पीडित तरुणाने व्हिडीओमध्ये सांगितलं.
हे ही वाचा: महिला अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार! उपायुक्तांसह 7 अधिकाऱ्यांना... नेमकं प्रकरण काय?
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गावात सगळीकडे संतापाचे वातावरण आहे. संघपालच्या आत्महत्येनंतर, रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला आणि व्हिडिओच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाला प्राधान्य देत इतर आरोपींचा देखील शोध सुरू केला आहे.
हे ही वाचा: दोन्ही मित्रांचं एकमेकांवरच प्रेम, मग समलैंगिक संबंध... पण अचानक तिसऱ्याची एन्ट्री अन्...
गावकऱ्यांनी केली मागणी
पीडित तरुणाचं म्हणणे वेळीच ऐकलं असतं तर त्याचा जीव वाचू शकला असता, असे गावकऱ्यांनी व्यक्त केलं. याप्रकरणी मृताचे कुटुंब आणि स्थानिक लोक दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. पीडित तरणाने दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून जबाबाच्या आधारे, दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीने दुसऱ्या कोणाचाही जीव जाऊ नये, अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
