'काकी त्याला घरातून न्यायची आणि..' पुतण्या काकूसाठी झालेला वेडापिसा, लागलेली तिच्यासोबतच्या संबंधाची चटक पण...

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आपल्याच काकीच्या प्रेमात आंधळा झालेल्या तरुणाने कुटुंबियांनी नात्याला विरोध केला असता विष पिऊन आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

young man fell in love with his aunt and had an immoral relationship but the family opposed him and he ended his life

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

07 Aug 2025 (अपडेटेड: 07 Aug 2025, 02:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

काकी आणि पुतण्याचे अनैतिक संबंध

point

प्रेमसंंबंधाला कुटुंबियांचा विरोध असताना तरुणाने स्वत:ला संपवलं..

point

नेमकी घटना काय?

Suicide Case: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एका वेगळ्याच आणि नात्याची मर्यादा ओलांडणाऱ्या प्रेमसंबंधातून धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका तरुणाचं त्याच्या काकीवरच प्रेम जडलं. मात्र, काकीच्या प्रेमात आंधळा झालेल्या तरुणाने कुटुंबियांनी नात्याला विरोध केला असता विष पिऊन आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

काकीसोबत 5 वर्षांपासून प्रेमसंबंध

घटनेतील मृत पावलेल्या तरुणाचं नाव विजय पाल असल्याचं समोर आलं आहे. तसेच, पीडित तरुणाचे त्याच्या सक्ख्या काकीसोबत अनैतिक संबंध सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. विजयचे त्याच्या काकीसोबत जवळपास 5 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. या प्रकरणासंबंधी विजयचे आई-वडील तरुणाच्या काकीला मृत्यूसाठी जबाबदार ठरवत तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. 

काकीवर केले पैसे खर्च 

विजयची आईने दिलेल्या माहितीनुसार, अगदी 5 वर्षांपासून विजय आणि त्याच्या काकीचे प्रेमसंबंध सुरू होते. या दरम्यान, विजयला त्याच्या काकीने तिच्या इतकं आधीन केलं होतं, तो कोणाचं काहीच ऐकत नव्हता. यामुळे, तरुणाला समाजाची काहीच पर्वा नव्हती. विजयची काकी त्याला नेहमी घरी घेऊन जायची आणि तिच्या कामासाठी विजयचा वापर करत असल्याचा मृताच्या आईने आरोप केला आहे. विजयच्या आईच्या मते, विजयची काकी नेहमी विजयला तिच्यासाठी पैसे खर्च करण्यास भाग पाडायची. इतकेच नव्हे तर याविषयी विचारलं असता विजय म्हणायचा, " मी तिच्यासोबत 3 वेळा लग्न केलं आहे. यासाठी 1.5 लाख रुपये लागले."

हे ही वाचा: गंगा नदीमध्ये अंघोळीसाठी गेला अन् माघारी पत्नीचा भलताच कारनाना... नेमकं काय घडलं?

कुटुंबियांनी काय सांगितलं?

विजयच्या मृत्यूच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? याबद्दल विजयच्या वडिलांनी माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, विजय रविवारी रात्री घरी आणि मागच्या झोपडीत जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी त्याची काकी मागच्या रस्त्याने तिथे आली आणि विजयला उचलून घेऊन गेली. संध्याकाळी पीडित तरुणाचे वडील कामाहून घरी परतले असता त्याने विष पिऊन स्वत:ला संपवलं असल्याचं समोर दिसलं. तसेच, त्याचे वडील पुढे म्हणाले, विजयच्या मृत्यूआधी तो नेहमी म्हणत होता, की "जोपर्यंत ती येणार नाही, मी हॉस्पिटलमध्ये जाणार नाही." कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, नात्याने ती विजयची काकी लागत असून सुद्धा काहीच विचार न करता तिने विजयसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. 

हे ही वाचा: 10 वर्षानंतर अचानक पती साधूच्या वेशात घुसला घरात... पत्नीने ओळखलंच नाही अन् रात्रीच घडलं...

विजयच्या कुटुंबियांनी त्याच्या काकीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून तिच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मृताच्या वडिलांनी विजयच्या काकीविरोधात कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्यांनी पोलिसांकडे आपल्याला तीन मुलं असून ती त्यांना सुद्धा तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढू शकत असल्याचं वडिलांनी व्यक्त केलं. 

    follow whatsapp