गंगा नदीमध्ये अंघोळीसाठी गेला अन् माघारी पत्नीचा भलताच कारनामा... नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पती गंगा नदीमध्ये अंघोळीसाठी गेला असताना पत्नी त्याच्या प्रियकरासोबत पळून गेली आणि तिच्यासोबत ती तिच्या मुलाला सुद्धा घेऊन गेली.

गंगा नदीमध्ये अंघोळीसाठी गेला अन् माघारी पत्नीनेच दिला धोका...
गंगा नदीमध्ये अंघोळीसाठी गेला अन् माघारी पत्नीनेच दिला धोका...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पती अंघोळीसाठी गेला असताना पत्नीचा भलताच कारनामा

point

पतीला पत्नीकडूनच मिळाला धोका... नेमकं काय घडलं?

Crime news: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक व्यक्ती श्रावण महिन्यात गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेला असता त्याच्या माघारी पत्नी भलतंच काहीतरी करुन बसली आणि ज्यामुळे पतीला मोठा धोका मिळाला. खरंतर, पती गंगा नदीमध्ये अंघोळीसाठी गेला असताना पत्नी त्याच्या प्रियकरासोबत पळून गेली आणि तिच्यासोबत ती तिच्या मुलाला सुद्धा घेऊन गेली. 

प्रियकरासोबत पळून जाताना ती घरातील दागिने सुद्धा सोबत घेऊन गेली. पत्नी आपल्या मुलासोबत बेपत्ता असल्याचं कळताच पतीला मोठा धक्का बसला आणि त्याने पोलीस स्टेसनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. 

गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेला अन्...

हे प्रकरण कानपुरच्या शिवराजपुरमधील एका गावात घडल्याची माहिती आहे. येथे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कार्यरत असलेले अजय सिंग श्रावणातल्या सोमवारी गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी खेरेश्वर घाट येथे गेला होता. 

पत्नी प्रियकरासोबत गेली पळून 

मिळालेल्या माहितीनुसार, तो गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेला असता त्याच्या माघारी त्याची पत्नी घरातील दागिने आणि मुलाला सोबत घेऊन प्रियकरासोबत पळून गेली. प्रियकराचं नाव दीपक कटियार असल्याचं समोर आलं आहे. पती घरी परतला असता त्याने त्याच्या घराला कुलूप असल्याचं पाहिलं. त्यानंतर जवळपासच्या लोकांना त्याने याबद्दल विचारलं असता त्याची पत्नी दुसऱ्याच पुरुषासोबत कारमध्ये बसून गेली असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर ती तिच्यासोबत तिच्या मुलाला आणि घरातील दागिने घेऊन गेल्याचं समजलं.

हे ही वाचा: 10 वर्षानंतर अचानक पती साधूच्या वेशात घुसला घरात... पत्नीने ओळखलंच नाही अन् रात्रीच घडलं...

पत्नीचे दुसऱ्याच पुरुषासोबत अनैतिक संबंध   

या घटनेनंतर पीडित पतीला त्याच्या पत्नीचे दीपक नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. पती घराच्या बाहेर गेल्यानंतर त्याची पत्नी दीपकला भेटण्यासाठी तिच्या घरी बोलवायची. तसेच, पत्नीसुद्धा तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी बाहेर जायची. 

हे ही वाचा: Personal Finance: आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर IAS चा पगार किती असेल?

प्रकरणाची माहिती देताना एसीपी म्हणाले, "अजयने त्याची पत्नी पळून गेल्याची तक्रार दाखल केली आहे. त्याच्या पत्नीचे दीपक नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. प्रकरणातील आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचाही शोध सुरू आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp