Sexual harassment: उत्तर प्रदेशात एका महिला अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं. या गुन्ह्याअंतर्गत मथुरा येथील राज्य कर विभागात कार्यरत असलेले असलेले उपायुक्त कमलेश कुमार पांडे यांच्यासह सात अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. इतर सहा सदस्य अंतर्गत तक्रार समितीचे सदस्य असून ज्यांच्यावर आरोपी उपायुक्तांना संरक्षण दिल्याचा आरोप आहे. मंगळवारी संध्याकाळी उशिरा सहसचिव रघुबीर प्रसाद यांनी प्रकरणाती आरोपी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती आहे. संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
महिला अधिकाऱ्यावर लैंगिक छळ
प्रकरणातील मुख्य आरोपी कमलेश कुमार हे मथुरा येथील राज्य कर विभाग 1 मध्ये कार्यरत असून त्यांची सहकारी असलेल्या महिला अधिकाऱ्याने त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. इतकेच नव्हे तर बऱ्याचदा पीडितेसोबत त्यांनी अनैतिक वर्तन केल्याचा आरोपही तिने केला होता. प्रकरणाची चौकशी केली असता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला अधिकाऱ्याने केलेले आरोप खरे असल्याचं आढळून आले. यानंतर आरोपी उपायुक्तांना उत्तर प्रदेश सरकारी सेवक (शिस्त आणि अपील) नियमांनुसार निलंबित करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.
हे ही वाचा: दोन्ही मित्रांचं एकमेकांवरच प्रेम, मग समलैंगिक संबंध... पण अचानक तिसऱ्याची एन्ट्री अन्...
महिला अधिकाऱ्याने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी अंतर्गत तक्रार समिती (विशाखा) कडे देण्यात आली होती. तसेच, या सहा सदस्यांच्या समितीवर तपासाच्या नावाखाली आरोपी अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि त्यांची जबाबदारी पार पाडली नसल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा: जळगावात चड्डी गँगची दहशत! अर्धनग्न अवस्थेत मंदिरातून पादुका, दानपेटीतील रक्कम चोरली अन् घरात सुद्धा...
'या' अधिकाऱ्यांना निलंबित...
या प्रकरणासंदर्भात अंतर्गत तक्रार समितीच्या सदस्या कोमल छाब्रा (सहाय्यक आयुक्त, फ्लाइंग स्क्वॉड युनिट-2, मथुरा), प्रतिभा (उपआयुक्त, विशेष तपास शाखा, मथुरा), पूजा गौतम (सहायक आयुक्त, राज्य कर ब्लॉक-2 मथुरा), संजीव कुमार (उपआयुक्त, राज्य कर ब्लॉक-5 मथुरा), सुनीता देवी (राज्य कर अधिकारी, ब्लॉक-3, मथुरा) आणि वीरेंद्र कुमार (उपआयुक्त ब्लॉक-3 मथुरा) यांना त्यांच्या पदांवरुन निलंबित करण्यात आलं आहे. कमलेश कुमार पांडे आणि समितीच्या सदस्यांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य कर विभागातील विशेष सचिव कृतिका ज्योत्स्ना यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
