Shocking Murder Case Viral : केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील 4 महिला 20 वर्षांपासून बेपत्ता झाल्या आहेत. या महिलांचा शोध सुरु असतानाच या प्रकरणात एक नवा ट्वीस्ट समोर आला. पोलिसांना सेबेस्टियन नावाच्या 68 वर्षांच्या एका व्यक्तीच्या घरातून काही मानवी हाडे आणि खोपड्या सापडल्या आहेत. ही हाडे महिलांची आहेत. या हाडांमध्ये मांड्यांच्या हाडांचाही समावेश आहे. तसच खोपडीत असलेल्या एका दातामध्ये डेंटल क्लिपही मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सेबेस्टियन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
पोलिसांनी सेबेस्टियनच्या दोन एकर घराची आणि आसपासच्या जमिनीचा तपास केला. 28 जुलै रोजी खोदकामा दरम्यान एक खोपडी, मांड्यांची हाडे आणि एक तुटलेला दात आढळला होता. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्याच परिसरातील जमिनीचं खोदकाम केलं. घराजवळचं एक तलावही खाली केलं आणि त्या तलावाच्या तळाचं खोदकाम केलं. त्या ठिकाणी पोलिसांना एक बॅग, साडीचा एक तुकडा, काही कपडे आणि एक माळ सापडली.
ADVERTISEMENT
आरोपी सेबेस्टियनच्या घरात काय आढळलं?
घरात असलेल्या एका सेप्टिक टँकलाही खाली करण्यात आलं. पण तिथे काहीच संशयास्पद सापडलं नाही. पोलिसांनी हाडांचा शोध लावण्यासाठी ग्राऊंड-पेनेट्रेटिंग रडारचा वापर केला. तसच एक कॅडवर कुत्र्याचीही मदत घेतली. शोधमोहिमेत कोणालाही परिसरात येण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. घरातच बसवलेली ग्रेनाईटची फरशीही खोदण्याचा प्लॅन आहे. सेबेस्टियनच्या घरातून दोन नवीन सिम कार्डही सापडले आहेत.
हे ही वाचा >> राहुल गांधींनी दाखवली 'ती' मतदार यादी, पुरावे अन्... Voter list मध्ये नेमकी काय गडबड? समजून घ्या क्रोनोलॉजी
कोणत्या महिलेची हाडे सापडली?
सेबेस्टियनच्या घरात पोलिसांना मिळालेली हाडे, खोपडी आणि दातावर लागलेल्या क्लिपमुळे महिलेची ओळख पटली. पोलिसांनी म्हटलंय की, ही क्लिप वनराडमध्ये पंचायत समितीतील कर्मचारी आयशाची आहेत. आयशा काही वर्षांपूर्वी गायब झाली होती. मागील २० वर्षात ज्या चार महिला बेपत्ता झाल्या होत्या, त्या प्रकरणात सेबेस्टियनचा हात असल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांना संशय आहे की, सेबेस्टियन एखादा सीरियल किलर असू शकतो. परंतु, त्याने अजूनही गुन्हा कबूल केलेला नाही.
दरम्यान, कोट्टयमचे क्राईम ब्रँच अधिकारी जैनम्मा बेपत्ता झाल्याचा तपास करत आहेत. तर अल्लपुझ्झा येथील क्राईम बँचची टीम आयशाच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करत आहेत. तर दुसरीडे स्टेट क्राईम ब्रँच बिंदू पद्मनाभनच्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सर्वांनी मिळून सेबेस्टिनयची तासनतास चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, सेबेस्टेयिनने कबुल केलं की तो या तीन महिलांना ओळखत होता आणि त्यांच्यासोबत त्याचं आर्थिक व्यवहार सुद्धा होतं. पण त्या महिलांसोबत नेमकं काय घडलं, हे त्याने सांगितलं नाही.
हे ही वाचा >> बाईईई..हा काय प्रकार! रक्षाबंधनाआधीच सोन्या-चांदीचे दर कडाडले..तुमच्या शहरातील आजचे भाव वाचून टेन्शनच वाढेल
ADVERTISEMENT
