Crime news : मेरठमध्ये काही महिन्यांपूर्वी एका महिलेनं अनैतिक संबंधातून पतीचीच हत्या केली होती. तर आता मेरठ येथेच रविशंकर नावाच्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीला गरोदर असताना चाकूने सपासप वार करत तिचा खून केला. त्यानंतर तोच आपल्या पत्नीच्या प्रेताजवळ दोन तास बसला होता. त्यानंतर त्याने स्वत:च पोलिसांना फोनद्वारे संपर्क साधला. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. रविशंकरच्या चेहऱ्याला आणि हाताला रक्त लागलेलं होतं. त्याने केलेल्या कृत्याचा त्याला कसलाही पश्चिताप झाला नाही.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मेहुणी आणि पत्नी फोनवर सतत बोलायच्या, पतीला वाटलं दोघीही लेस्बियन, नंतर फॅनला लटकलेला आढळला मृतदेह...
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी केलेल्या तपासातून माहिती समोर आली की, रविशंकरनेच ही हत्या केली आहे. पत्नी सपना ही बहिणीच्या घरी बऱ्यापैकी राहायची. तिने अनेकदा बहिणीच्या घरी न जाण्यास सांगितलं असता, पीडित पत्नीने पतीचं ऐकलं नाही आणि त्यातूनच ही हत्या करण्यात आली.
रविशंकरने आरोप केला की, सपना ज्या व्यक्तीला तिचा भाऊजी समजायची, तो व्यक्ती दुसराच कोणी,तरी होता. तिचे आपल्या भाऊजीसोबत अगदी जवळचे संबंध तयार झाले होते. त्यानंतर पतीने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलत आपल्या पत्नीची हत्या केली. दरम्यान, मृत्यू झालेल्या सपनाच्या भावाने सांगितले की, शीवशंकरने स्वत: ला वाचवण्यासाठी असे गंभीर आरोप केले आहेत. त्याने हुंड्यासाठीच पत्नीची हत्या केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
रविशंकर दुचाकीवरून आला नंतर एका खोलीत नेलं...
भावाने दिलेल्या माहितीनुसार, 29 जून रोजी बहीण सपनाला मारहाण करण्यात आली आणि नंतर घरातून हकलून दिले. सपना तिच्या बहिणीकडे राहण्यासाठी अमेढा येथे आली होती. त्यानंतर शनिवारी रविशंकर दुचाकीवरून आला आणि तिला एका खोलीत नेल्यानंतर चाकूने गळा चिरला. या घटनेनं ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : पुतणीचाच जडला काकावर जीव, नंतर दोघांनीही केलं पळून जाऊन लग्न, नंतर कुटुंबीयांनी भररस्त्यातच...
संबंधित प्रकरणात सूत्रांनी माहिती दिलीये की, रविशंकरने सपनाला डोळे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर तिला एक लॉकेट देईल असं सांगितलं आणि रवीशंकरने चाकूने तिचा गळा चिरला आहे. यादरम्यान, सपनाचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
ADVERTISEMENT
