crime news : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नोकरीच्या शोधात आलेल्या एका परदेशी तरुणीला चोर असल्याचं समजून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या एकूण संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 आरोपींना अटक केली आहे. तसेच इतरांचा शोध सध्या सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महिलेचे 'तसले' फोटो अन् व्यवसायिक पाघळला, फेसबुक फ्रेंडनं 52 लाखांना घातला गंडा, भयंकर हनी ट्रॅप
नेमकं प्रकरण काय?
शनिवारी रात्री ठाणे किला परिसरातील बारामदी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेपाळ येथील पोखरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तरुणीचं नाव सुषमा सरू असे आहे. नोएडात तिची नोकरी सुटल्यानंतर कामाच्या शोधात तिनं पुन्हा नोकरीची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. शनिवारी रात्री उशीरा 1 वाजण्याच्या सुमारास तरुणी घराच्या टेरेसवर फोनवर बोलत होती. काही लोकांना तरुणी चोर असल्याचे समजून आरडाओरड करण्यास सुरूवात केली.
चार आरोपींना अटक
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी व्हिडिओ पाहत आणि पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीवरून कारवाई केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी मानुष पारीक यांनी सांगितलं की, शिवम सक्सेना, अमन सक्सेना आणि अरुण सैनी नावाच्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : कोकणात पावसाचा वेग मंदावला, 'या' भागात पावसाचा येलो अलर्ट जारी, आजचं वातावरण घ्या जाणून
पोलिसांनी व्हिडिओच्या मदतीने आरोपींचा तपास केला आणि त्यांना अटक केली. दरम्यान, पीडित तरुणीला केलेल्या मारहाणीत तिचे दोन दात तुटले गेले आहेत. तसेच ती गंभीर जखमी झाली. तिच्या उपचारासाठी तिला एका रुग्णालयात भरती केलं. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
