'तसले' फोटो पाहिले आणि 65 वर्षीय व्यापारी पार नादावला, फेसबुकवरचा 'त्या' महिलेने जाळ्यात ओढलं अन्...

mumbai honey trap : मुंबईतील अंधेरी येथे राहणारा एक 65 वर्षीय व्यवसायिक हनी ट्रॅपला बळी पडला. फेसबुकवरचे अज्ञात महिलेचा फोटो आणि आकर्षक प्रोफाइल पाहून व्यवसायिक पाघळला. 

mumbai honey trap woman dupes 65 year old businessman of rs 52 lakh
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील व्यवसायिकाला घातला 52 लाखांचा गंडा

point

व्यवसायिक हनी ट्रॅपला बळी पडला

point

नेमकं काय घडलं?

Mumbai honey trap : मुंबईतील अंधेरी येथे राहणारा एक 65 वर्षीय व्यवसायिक हनी ट्रॅपला बळी पडला. फेसबुकवरच्या अज्ञात महिलेचा फोटो आणि आकर्षक प्रोफाइल पाहून व्यवसायिक पिघळला. महिला नेटकऱ्याने स्वत:ची ओळख सुप्रिता शर्मा अशी सांगितली. तिने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिषही दाखवले. महिलेनं सांगितल्याप्रमाणे व्यावसायिकाने बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवले आणि पुन्हा पैसे परत मिळालेच नाही. 

हे ही वाचा : बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवताना प्रायव्हेट पार्टला झाली जखम, दादर रेल्वे पोलीस म्हणाले...

नेमकं प्रकरण काय? 

दिलेल्या तक्रारीनुसार, कथित सुप्रिता शर्माने स्वत: हाँगकाँग येथील सुप्रसिद्ध टेक कंपनीच्या अधिकारी असल्याचं सांगितलं. जून महिन्यात सुप्रिताने फेसबुकवर व्यवसायिकाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. तिच्या प्रोफाइलमध्ये सुंदर आणि आकर्षक फोटो होते. व्यावसायिक महिलेचे फोटो पाहून पिघळला. तेव्हा त्या महिलेला व्यावसायिकाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असता, महिलेनंही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर ते व्यवसायाबाबत एकमेकांशी बोलू लागले. सुप्रिताने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा कमावण्याचा दावा केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, संभाषणाच्या दरम्यान, सुप्रिताने व्यवसायिकाचा विश्वास मिळवला. नंतर त्याला बिटकॉनइनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि तिच्या खात्यात तब्बल 52 लाख रुपये हप्त्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. यानंतर, तिने अचानकपणे व्यावसायिकाशी असलेले सर्व संपर्क तोडले आणि ती गायबच झाली.

हे ही वाचा : मिथून राशीत त्रिग्रही योग तयार होणार, काही राशीतील लोकांना लॉटरी लागणार, तुमच्या राशीत काय लिहिलं?

अनेकदा कॉल्स मेसेज केले पण..

 

पीडित व्यवसायिकाने दावा केला की, तिला अनेकदा कॉल्स, मेसेज केले आणि इमेलद्वारेही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्न निष्फळ ठरला आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात संपर्क साधला. सायबर तज्ज्ञांनी केलेल्या मदतीने, अंधेरी पोलीस आरोपी महिलेचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp