Crime News: उत्तर प्रदेशात एका 28 वर्षीय तरुणाची चाकूने वार करुन आणि गोळी मारून हत्या करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित तरुणीच्या पत्नीने तिचा प्रियकर म्हणजेच तिच्या दीरासोबत मिळून पतीच्या हत्येची योजना आखली, असं सांगण्यात येत आहे. गुरुवारी (7 जुलै) सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पीडित तरुणीचं नाव शाहनवाज तर पत्नीचं नाव मैफरीन असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
गोळी मारुन आरोपी फरार
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, शाहनवाज त्याच्या पत्नीसोबत शामली जिल्ह्यात त्याच्या मेव्हण्याच्या लग्न संमारंभासाठी जात होता. पीडित पती बाइक चालवत असताना समोरुन दोन मोटरसायकलवरील चार अज्ञात लोकांनी शाहनवाजच्या गाडीला ओव्हरटेक करत थांबवलं. मिळालेल्या वृत्तानुसार, त्या चार आरोपींनी पीडित तरुणावर दांडक्याने आणि चाकूने वार केले. त्यानंतर आरोपी तरुणांपैकी एकाने चाकू काढून शाहनवाजला गोळी मारली. पीडित तरुणावर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले.
रिपोर्टनुसार, शाहनवाजला नंतर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. रुग्णालयातील अधिकाऱ्यांना पीडित तरुणाच्या हात, छाती आणि मानेवर तीन खोल वार झाल्याचं आढळलं. तसेच, पीडित तरुण हरियाणाचा रहिवासी असून तो एक फर्नीचर कामगार म्हणून कार्यरत होता.
कुटुंबियांना आला चोरीचा संशय
घटनेनंतर शाहनवाजच्या पत्नीने तातडीने कैरान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. कुटुंबियांना सुरुवातीला हे चोरीचं प्रकरण असल्याचा संशय आला. पीडित तरुणाची मोटरसायकल आणि लग्नात आहेर म्हणून देण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या पैशांमुळे चोरी करण्यासाठी आरोपींनी त्याची हत्या केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला.
हे ही वाचा: अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येमागे नेमकं कोण? समोर आलं 'त्या' मुलीचं नाव, जिच्यामुळे वाद...
पत्नीचे दीरासोबत अनैतिक संबंध
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहनवाजच्या पत्नी आणि तिचा प्रियकर तसव्वुरने हत्येचा कट रचला होता. खरंतर, मैफरीन आणि तसव्वुरच्या नात्यात शाहनवाज अडसर ठरत असल्याकारणाने त्या दोघांनी त्याची हत्या करण्याचं ठरवलं. तसव्वुर हा शाहनवाजचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहनवाजचा त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबंधांबद्दल माहिती होती आणि तो नेहमी या सगळ्याला विरोध करायचा. याच कारणामुळे मैफरीन आणि तसव्वुरने आणखी तीन लोकांच्या मदतीने शाहनवाजचा काटा काढण्याची योजना आखली.
हे ही वाचा: अलार्म दाबताच रेड लाइट अन् आत संस्कारी माहोल... पोलिसांना समजली 'केम छो' बारची A to Z स्टोरी
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
पोलिसांनी तसव्वुर आणि आणखी एका आरोपीला अटक केली असून पीडित तरुणाची पत्नी फरार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रकरणाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, " आम्ही दोन आरोपींना अटक केली असून हत्येत वापरण्यात आलेलं शस्त्र जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजचा देखील तपास सुरु आहे. सध्या, पीडित तरुणाची पत्नी फरार असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे."
ADVERTISEMENT
