Jalgaon Crime News: जळगावमध्ये चड्डी गँगने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरांचे कुलूप तोडून दोन मंदिरांमधील चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील पैसे आणि इतर साहित्य चोरून नेल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, चोरांच्या हातात चॉपर, चाकू आणि तलवारीसारखी शस्त्रं देखील असल्याची स्थानिकांनी माहिती दिली. चड्डी गँगच्या दहशतीमुळे संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
ही घटना जळगावमधील रायसोनी नगरमध्ये मध्यरात्री अडीच वाजता घडली. चोरट्यांनी दोन मंदिरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि त्यातून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. याशिवाय, तिसऱ्या मंदिरात चोरी करण्यासाठी गेले असताना तिथे काहीच सापडलं नसल्यामुळे चोरट्यांनी तिथून एक पेन ड्राइव्ह चोरला. याशिवाय, त्यांनी शहराबाहेर गेलेल्या लोकांच्या घरातही घुसखोरी केल्याची माहिती समोर आली. एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील लोक घाबरले आहेत.
हे ही वाचा: टॉयलेट क्लीनर पाजलं आणि पत्नीलाच संपवलं, हत्येपूर्वी मौलानाने केली बेदम मारहाण अन् मृतदेह...
येथील परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरात चोरट्यांनी घुसून 700 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका, दीड फूट उंची असलेली गणपतीची मूर्ती आणि दानपेटीत असलेले पैसे चोरून नेले. खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरातील दानपेटी उघडली जात नव्हती, त्यामुळे नेमकी किती रक्कम होती हे कळू शकले नाही. तसेच, मंदिरांमध्ये आणि घरात चोरी करणारे चारही जण इतर राज्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोर परिसरात फिरताना चॉपर, चाकू आणि तलवार अशी शस्त्रेही त्यांच्यासोबत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.
हे ही वाचा: बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवताना प्रायव्हेट पार्टला झाली जखम, दादर रेल्वे पोलीस म्हणाले...
सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
चड्डी गँगने केलेल्या चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त शॉर्ट्स, मास्क आणि रुमाल अशा अर्धनग्न अवस्थेत चार लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. ते मंदिरात घुसून तसेच एका घराची झडती घेताना आणि चोरी करताना दिसत आहेत. मंदिरातून बाहेर पडताना, एका व्यक्तीने हातात चप्पल घेतलेली दिसत आहे तर दुसऱ्याने त्या त्याच्या कमरेला बांधलेल्या दिसत आहे. हे फुटेज मध्यरात्री ते पहाटे 2.31 च्या दरम्यान कैद केलं असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
